तीन वर्षांतून इथे भरतो लग्नासाठी मुलींचा बाजार, सुंदर बायकोसाठी होतो लिलाव

हुंडाबंदी हा भारतीय विवाह पद्धतीला लागलेला मोठा रोग आहे. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून मुलींनी आत्महत्या केल्याच्या किंवा त्या मुलींचा खून झाल्याच्या घटना आजही आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात. कायद्याने हुंडा देणे किंवा घेणे गुन्हा आहे, पण कायदा कोण पाळतो ? कित्येक माताभगिनींचे आयुष्य हुंडा नावाच्या राक्षसाने गिळंकृत केले आहे.

मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा लागणार म्हणूनही कित्येक आईवडिलांनी आपल्या मुलींना गर्भातच मारले आहे. थोडक्यात मुलगी म्हणजे परक्याचे धन, मुलीच्या लग्नासाठी बापाने आयुष्यभर मेहनत करून कमावलेली संपत्ती पणाला लावायची अशी आपल्याकडची धारणा आहे. अशामध्ये बुल्गारिया देशात लग्नासाठी मुलींचा भरवला जाणारा बाजार निश्चितच कौतुकाचा विषय आहे.

कुठे आणि कसा भरतो हा बाजार ?

बुल्गारिया हा युरोपमधील एक देश ! त्या देशातील कलाइदझी समुदायातील लोकांकडून लोक स्टारा जागोर याठिकाणी चक्क लग्नासाठी मुलींचा बाजार भरवला जातो. तीन वर्षांतून एकदा भरणाऱ्या या बाजारात विवाहेच्छुक मुलगा येऊन स्वतः येऊन आपल्या आवडीची मुलगी पसंत करतो. एवढेच नाही तर अगदी बाजारात जसा भाजीपाला विकत घेतो तसे मुलीची किंमत अदा करून तिला आपली पत्नीही बनवु शकतो.

आहे ना कमल ? मात्र हे लग्नाचा बाजार ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा गरिबांकडूनच भरवला जातो. त्यामुळे तिथल्या मुलींच्या बापांना मुलीच्या लग्नाची जास्त काळजी नसते. बुल्गारिया देशाला ऑटोमन साम्राज्य चालवणाऱ्या घराण्याकडून स्वातंत्र्य प्राप्त झाले होते.

इथे नवऱ्या मुलाला द्यावे लागतात पैसे

भारतात जसे नवरीच्या आईवडिलांना लग्नासाठी हुंडा द्यावा लागतो, त्याच्या उलट इथे लग्नाच्या बाजारातून मुलगी खरेदी करण्यासाठी नवऱ्याच्या आईवडिलांना पैसे मोजावे लागतात. या बाजारात मुलीचे आईवडील आपल्या मुलीला चांगले नटवून बाजारात आणतात. त्यात सगळ्या वयोगटातल्या मुली असतात. त्या बाजारात नवऱ्या मुलाला घेऊन त्याचे आईवडील येतात. मुलाला घेऊन बाजार हिंडतात.

मुलाला एखादी मुलगी आवडली की तिच्या आईवडिलांसोबत व्यवहाराची बोलणी चालू होते. दोन्हीकडचे पालक मंडळी नवरी मुलगी खरेदीची रक्कम ठरवतात. मग त्यांचे लग्न लावून दिले जाते. बुल्गारिया देशात अनेक वर्षांपासून अशा बाजाराची परंपरा आहे, कायदेशीररित्या त्याला आव्हान देता येत नाही.

हे आहेत या बाजाराचे नियम

ज्या गरिबांच्या घरात मुलीचे लग्न लावून देण्यासाठी आर्थिक अडचणी असतात त्यांनाच या बाजारात सहभागी होता येते. या बाजारात नवरी मुलीने आपल्या पालकांसोबत यावे लागते. नवऱ्या मुलाच्या पालकांनी नवरी मुलीच्या पालकांना हुंडा किंवा खरेदी रक्कम द्यावी लागते.

याला कायदेशीर मान्यता असून नियम पाळावे लागतात. एखाद्या मुलीला जास्त नवर्यांनी पसंत केल्यास त्या मुलीचा लिलाव केला जातो. जो जास्त रक्कम देइल त्या नवऱ्या मुळाशी तिचे लग्न लावले जाते. सर्वात महत्वाचे कलाइदझी समुदायाव्यतिरिक्त इतर मुलगी नवरी म्हणून स्वीकारता येत नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *