झोपडीत राहणाऱ्या शहिदाच्या कुटुंबियांकडे सरकारचे दुर्लक्ष, गावकऱ्यांनीच बांधून दिला बंगला

पूर आला आर्मी बोलवा, भूकंप झाला आर्मी बोलवा, हल्ला झाला आर्मी बोलवा; मग स्वातंत्र्यदिनाला राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी कुठल्या नेत्याला किंवा पुढाऱ्याला कशाला बोलावता, तिथेही एखाद्या निवृत्त सैनिकालाच बोलवा ! अशा आशयाचे अनेक व्हिडीओ आणि मेसेज काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

त्याचा इतका सकारात्मक परिणाम झाला की खरोखर लोकांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनाला सैनिकांच्या हस्ते स्वातंत्र्यदिन साजरा केला. असेच एक अतिशय सुंदर उदहारण मध्यप्रदेशात बघायला मिळाले आहे. एका शहिद सैनिकाच्या कुटुंबाकडे गेली २७ वर्ष सरकारने दुर्लक्ष केले, पण गावातील तरुणांनी पैसे गोळा करून त्या कुटुंबाला बंगला बांधून दिला आहे. पाहूया सविस्तर…

कोण आहेत ते शहिद आणि त्यांचे कुटुंबीय ?

मध्यप्रदेशाच्या इंदोर जिल्ह्यातील बेटमा गावातील मोहन सिंह सुनेर असे त्या शहिद सैनिकाचे नाव आहे. ३१ डिसेंबर १९९२ रोजी त्रिपुरामध्ये पोस्टिंगला असताना सीमा सुरक्षा दलाकडून आतंकवाद्यांशी लढताना मोहन सिंग शहीद झाले होते. त्यावेळी त्यांची पत्नी राजुबाई गर्भवती होती आणि त्यांना एक तीन वर्षांची मुलगीही होती. मोहन सिंहांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आपल्या मुलाबाळांसमवेत एका झोपडीत राहत होते. सरकारनेही इतके दिवस त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते.

गावकऱ्यांनी पैसे गोळा करून बांधला बंगला, स्वातंत्र्यदिनी दिला गिफ्ट

आपल्या गावातील शहिदाच्या कुटुंबाची अवस्था पाहून गावातील तरुण एकत्र आले. त्यांनी “One Check One Sign” नावाने एक अभियान सुरु केले. त्या माध्यमातून त्यांनी जवळपास ११ लाख रुपये गोळा केले. त्यातल्या १० लेखांतून त्यांनी मोहन सिंहांच्या कुटुंबियांसाठी बंगला बांधला आणि उरलेल्या १ लाखांतून मोहन सिंहांचे स्मारक केले आहे.

१५ ऑगस्ट आणि रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर त्यांनी राजूबाई यांना तो बंगला भेट दिला. त्या युवकांनी आपल्या हातांचे तळवे जमिनीवर ठेवून त्यावरून राजूबाई यांना चालवत त्यांचा गृहप्रवेश घडवून आणला.

व्हिडीओ पहा :

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *