सोनिया गांधींनी असे काय लिहिले होते कि अटलजी म्हणाले डिक्शनरीत बघून लिहिले आहे का?

१९ ऑगस्ट २००३ चा दिवस ! भारताच्या लोकसभेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. दोन दिवस वादविवाद चालला. अटलबिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते. सभागृहात वाजपेयी उठले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली, “मी माझ्या आयुष्यात अनेक अविश्वास प्रस्ताव बघितले आहेत, पण यासारखा बघितला नाही.

अविश्वास प्रस्ताव तेव्हा आणला जातो जेव्हा सरकार पडण्याच्या स्थितीत असते. किंवा विरोधी पक्ष काही करुन सरकार पाडू इच्छित असते. मग ही अद्भुत स्थिती आहे. ना आमचे सरकार पडण्याच्या स्थितीत आहे, ना विरोधक आमचे सरकार पाडू इच्छित आहेत. मग हा अविश्वास प्रस्ताव आणण्यामागचे कारण काय ?

विरोधकांनी वाजपेयींनावर अनेक आरोप लावले होते. उदा. या सरकारने अंतर्गत सुरक्षा पणाला लावली आहे. सरकारची संरक्षण नीती ठीक नाही. विदेशनीती ठीक नाही. या सगळ्या आरोपांना उत्तर देताना त्यादिवशी वाजपेयी प्रचंड तापले होते. देशाला गहाण ठेवण्याच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी सांगितले, ” तुम्हाला काय वाटते ? भारत इतका स्वस्त आहे का जे त्याला गहाण ठेवता येईल ? राजकारणाच्या या स्पर्धेत आपण एकमेकांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह नाही केले पाहिजे.

हा अविश्वास प्रस्ताव आणताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वाजपेयी सरकारला इन्कॉम्पिटेंट (अयोग्य), इन्सेंसिटिव (असंवेदनशील), इररेस्पॉन्सेबल (बेजबाबदार) आणि ब्रेजनली करप्ट (भ्रष्टाचारी) अशा उपमा दिल्या होत्या. वाजपेयी या शब्दांवर खूप नाराज झाले.

काँग्रेसला त्यांनी सांगितले, “सोनियाजींचे भाषण पाहून मी दंग झालो आहे. राजकीय क्षेत्रात आपल्या खांद्याला खांदा लावून जे लोक काम करत आहेत, त्यांच्याविषयी आपण हे सगळं लिहले आहे. मतभेद असतील, पण ते प्रकट करण्याची ही आपली पद्धत आहे का ? असं वाटतंय जसे डिक्शनरी उघडून त्याते शब्द निवडले आहेत.

पुढे वाजपयीनीं काँग्रेसला आव्हान देताना सांगितले, “आम्हाला इथल्या लोकांनी निवडून दिले आहे. जोपर्यंत लोकांची इच्छा आहे तोपर्यन्त आम्ही इथे राहणार. तुम्ही कोण आहेत आमचा निर्णय करणारे ? तुम्हाला कुणी न्यायाधीश बनवले आहे ? तुम्ही इथे शक्तीपरीक्षणासाठी तयार नाही. आता जेव्हा लोकसभा निवडणुका होतील, तेव्हा दोन हात होतीलच. पण हे काय आहे ? अरे सभ्य पद्धतीने लढा. या देशाच्या सन्मान ठेवा.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *