नाशिकमध्ये मिळतेय खऱ्याखुऱ्या सोन्याची मिठाई! प्रतिकिलोचा भाव ऐकून थक्क व्हाल..

श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिना सणांचा महिना मानला जातो. या महिन्‍यात नागपंचमी, रक्षाबंधन हे सण येतात. अन सण म्हणलं कि गोड पदार्थ आलेच. गोडधोड पूर्वी घरात बनवले जायचे. विविध प्रकारचे गोड पदार्थ पूर्वी घरोघरी बनवले जायचे. आजकालहि ते बनवले जातात. पण आजच्‍या धावपळीच्‍या जगात लोक रेडिमेट मिठाईला पहिली पसंदी देतात.

त्यामुळेच आजकाल ग्राहकांची आवड लक्षात घेऊन मार्केटमध्ये विविधप्रकारचे स्वीट मिळतात. ग्राहकांची आवड लक्षात घेउन बाजारात वेगवेगळ्‍या फ्‍लेवरच्‍या मिठाई बनविल्‍या जातात. यामध्ये आता एक नवीन भर पडली आहे. ती म्हणजे सोन्याची मिठाई. होय खऱ्याखुऱ्या चोवीस कॅरेट सोन्यापासून बनवलेली मिठाई.

हि आगळीवेगळी मिठाई मिळत आहे नाशिकमध्ये. नाशिकमध्ये सध्या या गोल्डन मिठाईची चांगलीच चर्चा आहे. नाशिकमधील सागर स्वीट्स यांनी राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर ग्राहकांसाठी हि खास मिठाई उपलब्ध करून दिली आहे. या मिठाईची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. पण नाशिकमध्ये हि मिठाई विकली जात आहे.

या मिठाईची किंमत आहे ९००० रुपये प्रतिकिलो. रक्षाबंधन निमित्ताने हि वेगळी मिठाई सध्या सागर स्वीट्समध्ये ठेवण्यात आली आहे. या मिठाईला गोल्डन राखी असे नाव ठेवण्यात आले आहे. या मिठाईचा आकार देखील राखीसारखाच बनवण्यात आला आहे. गोल्डन राखीसोबत गोल्डन स्पेशल, गोल्डन बदाम कतली आणि गोल्डन बिस्कीट अशा चार प्रकारच्या मिठाई येथे ठेवण्यात आल्या आहेत.

नाशिकराना अशाप्रकारची गोल्डन मिठाई बघण्याचा योग पहिल्यांदाच आला असून त्यामुळे नाशिकमध्ये चांगलीच चर्चा आहे. हि मिठाई घेऊन भावाचं तोंड गोड करणं थोडं महागात पडू शकतं.हि मिठाई २४ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आलेली असून तिला सोन्याचा वर्ख लावण्यात आलेला आहे.

मागच्या रक्षाबंधनला सुरतच्या मॅजिक दुकानामध्ये अशाच प्रकारची मिठाई ठेवण्यात आली होती. हि सर्वात महाग मिठाई तेव्हापासूनच भारतात लोकप्रिय ठरली होती.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *