तुम्ही सिंगल असाल तर मग या ७ गोष्टी नक्की करा!

आजकाल अनेक जण रिलेशनशिप मध्ये असतात. तर सिंगल असणाऱ्यांचे प्रमाण देखील मोठं आहे. सिंगल असताना आयुष्याचा आनंद खूप चांगल्या प्रकारे घेता येतो. रिलेशनशिपमध्येच सुख असते असा समज आजकाल बनलेला आहे. पण असे काही नसून सिंगल असताना देखील आयुष्य सुखात जगता येते. तुम्हीही सिंगल असाल तर या ७ गोष्टी नक्की करा..

१. स्वतःवर प्रेम करा –

आयुष्यात स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःचीच कंपनी एन्जॉय करा. आपल्या आरोग्याची काळजी नीट घेण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ मिळेल. व्यायाम करून आपल्या आरोग्याची नीट काळजी घ्या.

२. स्वतःवरच शंका घेऊ नका –

तुमचं रिलेशन तुटलं किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये नाहीयेत म्हणून स्वतःवरच शंका घेऊ नका. ‘मी रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या लायक नाही’,’कोणीही माझ्यावर प्रेम करत नाही’ किंवा ‘आता मला पुन्हा कोणावर प्रेम करता येईल का?’, यांसारखे नकारत्मक विचार मनात येऊ देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वास-सकारात्मक विचारांनी आयुष्य जगा.

३. स्वतःची कामं स्वतः करा –

सर्व गोष्टी एकट्यानं करण्याचा प्रयत्न करा आणि अधिक स्वातंत्र्य मिळवा. ही गोष्ट आत्मसात करण्यास वेळ लागेल पण नवनवीन गोष्टी शिकताना आत्मविश्वास वाढण्यासही मदत होईल.

४. चांगल्या गोष्टींची सवय लावण्याचा निश्चय –

चांगल्या गोष्टींच्या सवयी कधीही फायद्याच्याच असतात. त्यामुळे चांगल्या गोष्टींच्या सवयी लागण्यासाठी प्रयत्न तर कराच पण याचा निश्चय देखील करा. ३० मिनिटांसाठी व्यायाम, भरपूर प्रमाणात पाणी पिणे, सकाळी लवकर उठणे, वेळेवर झोपणे, खाणे-पिणे आणि योग यांसारख्या गोष्टींचा समावेश करावा.

५. स्वतःची कोणासोबतही तुलना करू नका –

आपल्याला नेहमीच दुसऱ्यांसोबत तुलना करण्याची सवय असते. हि सवय अगोदर बंद करा. स्वतःची कधीच कोणासोबतही तुलना करू नका. करिअर, लव्ह लाइफ, फॅशन सेन्स, शरीर रचना इत्यादी गोष्टी सहसा आपण दुसऱ्यांसोबत तुलना करून बघतो. त्यामुळे आपल्या आत्मविश्वासात घट होते.

६. जुन्या मित्रांसोबत पुन्हा संपर्कात या-

बऱ्याचदा करिअरच्या आणि इतर कामाच्या व्यापात तुम्हाला मित्रांना वेळ देणं शक्य होत नाही. त्यामुळे मित्रांसाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा.

७. जास्त विचार करू नका –

जास्त विचार करण्याची सवय असेल तर हि सवय बंद करा. कारण हि एक वाईट सवय आहे. जास्त विचार केल्यानं समस्या सुटत नाहीत तर अधिक वाढतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *