कौन बनेगा करोडपातीच्या विजेत्याने एका वर्षात बिहारमध्ये लावली तब्बल एवढी झाडे!

कधीकाळी बिहारमधील चंपारणचे नाव चंपकारण्य असल्याचे आपण वाचले असेल. इथल्या वनांमध्ये चंपा झाडे मोठ्या प्रमाणावर असल्याने हे नाव पडले होते. पण चंपारणमध्ये वास्तव्याला असताना “त्याला” कुठेच चंपाची झाडे दिसत नव्हती. जरी दिसली तरी ती ओळखता येत नव्हती.

ही गोष्ट त्याच्या मनाला खात होती. कौन बनेगा करोडपतीमध्ये विजयी ठरल्यानंतर त्याच्या मनात विचार आला की या चंपारण क्षेत्राला पार्ट एकदा त्याचे चंपकारण्याची ओळख मिळवून द्यायची. मनाशी निश्चय झाला आणि बघता बघता त्याने चंपाची ७०००० झाडे लावली. पाहूया एका अवलियाची गोष्ट…

रोजगार हमी ते कौन बनेगा करोडपती विजेता

बिहारच्या चंपारण जिल्ह्यातील मोतीहारी गावात राहणाऱ्या सुशील कुमारने २०११ मध्ये कौन बनेगा करोडपतीच्या पाचव्या सिजनमध्ये ५ कोटी रुपये जिंकले होते. त्यापूर्वी सुशील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत एक कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होते. तेव्हा त्यांना ६००० रुपये पगार होता. त्यासोबतच सुशील आपल्या घरी असणाऱ्या पाच गायींच्या मदतीने दुधाचा व्यवसायही करत होता. कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून सुशील रातोरात करोडपती झाला.

करोडपती सुशील ते चंपा, वड, पिंपळवाला सुशील

चंपारण हे गाव महात्मा गांधींनी केलेल्या नीळ सत्याग्रहासाठी प्रसिद्ध आहे. त्याच चंपारणमधील मोदींच्या एका सभेसाठी रस्त्यांवरील अतिक्रमण काढल्याने रस्ते मोठे आणि स्वच्छ झाले होते. सुशील यांनी विचार केला की इथे चंपाची झाडे लावली जाऊ शकतात. त्यांनी विश्व पृथ्वी दिवस २२ एप्रिल २०१८ पासून चंपाची झाडे लावण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी Five Iconic Place याठिकाणी पहिले चंपाचे झाड लावले. तिथून हे अभियान सुरु झाले आणि लोकही त्यात जोडत गेले.

…आणि ७०००० झाडे लावली

सुशील यांच्या मोतीहारी गावात तर असे एक घर सापडणार नाही जिथे चंपाचे झाड नाही. ५ जून २०१८ रोजी जागतिक वन दिनाच्या निमित्तानेही चंपाची २१००० झाडे लावण्यात आली. सुशील यांनी आतापर्यंत ७०००० हुन अधिक चंपाची झाडे लावली आहेत.

या अभियानाला त्यांनी “चंपा से चंपारण” असे नाव दिले होते. त्यांनी लावलेल्या प्रत्येक झाडाची नोंद रजिस्टरमध्ये करण्यात आली आहे. आता त्यांनी पिंपळ आणि वडाची झाडे लावण्यासाठी “वड पिंपळ वृक्षारोपण” अभियान सुरु केले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *