कलम ३७० वरून चक्क पाकिस्तानमध्ये झळकले शिवसेनेचे पोस्टर्स! बघा व्हिडीओ..

काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा मोदी सरकारने मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला. हे विधेयक राज्यसभेत आणि लोकसभेत आज पास झालं. काल राज्यसभेत हे विधेयक आल्यानंतर यावर जोरदार चर्चा झाली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या प्रस्तावावर राज्यसभेत केलेलं भाषण चांगलच गाजलं. या भाषणाचे पडसाद थेट पाकिस्तानात उमटल्याचे आता पाहायला मिळत आहेत. इस्लामाबादेत जागोजागी संजय राऊत यांचे पोस्टर्स लागले आहेत.

संजय राऊत यांनी राज्यसभेत विधेयकाच्या चर्चेत काल (०५ ऑगस्ट) जम्मू-काश्मीर खऱ्या अर्थानं भारतात घेतलं, पुढे पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानही घेऊ, असं विधान केलं होतं. राऊत यांच्या या विधानाचे इस्लामाबादेत पोस्टर्स लावण्यात आले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भाषणाची दखल इस्लामाबादलाही घ्यावी लागली आहे.

इस्लामाबादमध्ये झळकलेल्या पोस्टर्सवर ‘महाभारत स्टेप फॉरवर्ड’ असे शीर्षक लिहिण्यात आहे. त्याखाली संजय राऊतांचे पूर्ण विधान लिहिण्यात आले आहे. “आज कश्मीर लिया है। कल बलूचिस्तान और पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर ले लेंगे। मुझे विश्वास है की पीएम मोदी अखंड हिंदुस्तान का सपना पूरा करेंगे।”

एका व्यक्तीने हायवेला लागलेल्या पोस्टर्सचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून त्याने संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानमध्ये भारताला सपोर्ट करणारे पोस्टर्स झळकल्याने तो व्यक्ती चांगलाच संतापलेला दिसत आहे.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *