कलम ३७० हटवल्याने नक्की काय होणार ?

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण होते. काश्मीरमध्ये अगोदरच ९०००० केंद्रीय सुरक्षा बल तैनात असताना मागच्या १० दिवसांत अजून ३८००० जवान तिथे तैनात करण्यात आले होते. एअरफोर्सला सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते, तसेच अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली होती.

बाहेरच्या राज्यातील आणि देशांतील पर्यटकांनाही आपापल्या घरी परत जाण्याचे आदेश देण्यात आले होते. काल रात्रीपासून इंटरनेट. दूरध्वनी आणि टेलिव्हिजन सेवा बंद करण्यात आल्या होत्या. तसेच श्रीनगर आणि जम्मूमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले होते.

काश्मीर बाबत महत्वाचे ४ निर्णय कोणते झाले ?

कालपासून “कुछ तो बडा होनेवाला है” असे जे वातावरण निर्माण झाले होते, त्यावर आज अखेर पडदा पडला आहे. राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ३७० कलम हटवण्याचा निर्णय जाहीर केला. ७२ वर्षांनंतर जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याबाबत ठोस पाऊल उचलले गेले आहे.

हे कलम हटवत असतानाच जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन करण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा हटवून आता जम्मू काश्मीरला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश आणि लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश असणार आहे.

३७० कलम हटवल्याने नक्की काय होणार ?

३७० कलम हटवल्याने आता जम्मू काश्मीर राज्याची स्वतंत्र वेगळी घटना असणार नाही, तिथे भारतीय राज्यघटनेचा अंमल लागू होईल. जम्मू काश्मीर राज्याचा स्वतःचा वेगळा ध्वज असणार नाही. यासोबतच जम्मू काश्मीरच्या नागरिकांचे भारत आणि जम्मू काश्मीर असे दुहेरी नागरिकत्व संपुष्ठात येईल.

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय नागरिकांना संपत्ती खरेदीचा आणि गुंतवणुकीची मार्ग मोकळा होणरत आहे. जम्मू काश्मीरमध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकणार आहे. जम्मू काश्मीर राज्यासाठी नवा कायदा करण्यासाठी जम्मू काश्मीर राज्य सरकारच्या संमतीची आवश्यकता राहणार नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *