सलमान खानच्या मदतीने कॅटरिना कैफची बहीण करणार बॉलिवूडमध्ये करणार एंट्री

हॉंगकॉंगमध्ये जन्मलेल्या मूळच्या भारतीय वंशाच्या कॅटरिना कैफ या अभिनेत्रीने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीच्या काळात नीटसं हिंदीही न बोलता येणाऱ्या कॅटरिनाने आपल्या ऍक्टिंगच्या कौशल्यावर त्यावर मात केली आणि बॉलिवूडमधील आघाडीच्या नायिकांमध्ये स्थान मिळवले. कॅटरिना भारतात कामगार परवाना वापरून काम करते. आता तिची बहीणही तिच्याच पावलावर पॉल टाकत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. पाहूया कैफ फॅमिलीतील नव्या चेहऱ्याबद्दल…

या चित्रपटातुन कॅटरिना कैफची बहीण करणार बॉलिवूड एंट्री

इसाबेल कैफ असे कॅटरिनाच्या बहिणीचे नाव आहे. इसाबेलने आधी हॉलिवूडमध्ये Dr.Cabbie चित्रपटात काम करून आपली अदाकारी दाखवली आहे. तसेच तिने एका प्रसिद्ध फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग घेतले आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर याची माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये तरण आदर्श यांनी म्हटले आहे की, “कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफ ही आयुष शर्मा याच्यासोबत बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करेल.”

कोणता असेल इसाबेलचा पहिला चित्रपट ?

डायरेक्टर करण बुतानी दिग्दर्शित करत असणाऱ्या “क्वाथा” या चित्रपटाच्या माध्यमातून इसाबेल बॉलिवूड एंट्री करणार आहे. इसाबेल मागच्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये मॉडेलिंग करत आहे. २०१८ मध्ये लॅक्मे ब्युटी प्रोडक्टच्या एका जाहिरातीतही इसाबेल दिसली होती.

यापूर्वी “टाइम टू डान्स” या चित्रपटातून सूरज पांचोली याच्यासोबत ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल असे सांगितले जात होते. पण काही कारणांमुळे असं होऊ शकलं नाही. आता “क्वाथा” मधून इसाबेलची ऍक्टिंग आपल्याला बघायला मिळेल.

सलमानची काय मदत झाली ?

बी-टाऊन मधून आलेल्या बातम्यांनुसार आयुष शर्मा हा दुसरा तिसरा कुणी नसून सलमान खानचा मेव्हणा आहे. त्याच्यासोबतच इसाबेल कैफ एका बॉलिवूड चित्रपटातून पदार्पण करणार आहे. सलमान आणि कैफ फॅमिलीचा जुना परिचय आहे. सलमान आणि कॅटरिना यांचे प्रेमप्रकरण अनेक दिवस चर्चेत होते.

“क्वाथा” या चित्रपटाची कथा एका सत्य कथानकावर आधारित आहे. त्यात आयुष एका ऑफिसरच्या भूमिकेत दिसेल. सप्टेंबर महिन्यापासून चित्रपटाचे शूटिंग सुरु होईल आणि पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल असे बोलले जात आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *