या खेळाडूला संघात सहभागी नसतानाही मिळाला होता मॅन ऑफ द मॅच !

क्रिकेट विश्वात एक खूप प्रसिद्ध असा वाक्प्रचार नेहमी वापरला जातो, Catches Wins Matches ! तसं हा वाक्प्रचार खूप कमी क्रिकेटर्स गांभीर्याने घेतात. जे क्रिकेटर्स याला गांभीर्याने घेतात, ते महान खेळाडू म्हणून सन्मान मिळवतात हे अनेक उदाहरणांवरून म्हणता येते.

क्रिकेट जगतात अनेक असे क्रिकेटर असे आहेत जे केवळ त्यांच्या फिल्डिंग कौशल्याबद्दल ओळखले जातात. अशाच एका क्रिकेटरला संघात सहभागी नसतानाही मॅन ऑफ द मॅच हा सन्मान मिळाल्याची घटना क्रिकेटच्या इतिहासात निंद्य आहे.

कोण आहे तो नशीबवान क्रिकेटर ?

२७ जुलैला या क्रिकेटरचा वाढदिवस झाला. केवळ एक फिल्डर म्हणून या खेळाडूने क्रिकेट जगतात जितका नावलौकिक मिळवला तेवढा इतर कुठल्याही खेळाडूला मिळाला नाही. या क्रिकेटरची ओळख जगातील सर्वात महान क्षेत्ररक्षक म्हणून केली जाते. अगदी बरोबर, आपण ज्या क्रिकेटर बद्दल बोलतोय त्याचे नाव आहे जॉन्टी ऱ्होड्स ! दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू ! २७ जुलै १९६९ रोजी जन्मलेल्या जॉन्टी ऱ्होड्सचा ५० व वाढदिवस नुकताच साजरा झाला.

संघात समावेश नसतानाही कसा मिळाला जॉन्टीला मन ऑफ द मॅच पुरस्कार ?

२६ फेब्रुवारी १९९२ रोजी दक्षिण आफ्रिकेच्या संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जॉन्टी ऱ्होड्सने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एक असा विक्रम केला आहे, जो कदाचितच कधी मोडला जाऊ शकेल ! अंतिम ११ जणांच्या संघात सहभागी नसतानाही जॉन्टी ऱ्होड्सला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला होता.

झालं असं की जॉन्टीला फर्स्ट क्लास क्रिकेटच्या एका सामन्यात आपल्या संघाच्या एका खेळाडूच्या जागी बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरवण्यात आले होते. जॉन्टीने या संधीचे सोने केले आणि आपल्या कौशल्याने त्या सामन्यात ७ कॅच पकडून आपल्या संघाला मॅच जिंकून दिली. जॉन्टीच्या या प्रदर्शनाबद्दल त्याला मन ऑफ द मॅच खिताब देण्यात आला.

जॉन्टीने केलेला तो ऐतिहासिक रन आऊट

सध्या जॉन्टी ऱ्होड्सने टीम इंडियाचे फिल्डिंग कोच म्हणून आपला नामांकन आवेदन केले आहे. १९९२ च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जॉन्टी ऱ्होड्सने वेगाने पळत येऊन बॉल पकडून आणि हवेत झेप घेत इंझमाम उल हकला केलेला तो ऐतिहासिक रन आऊट आजही कित्येक क्रिकेटप्रेमींच्या काळजावर कोरला गेला आहे. त्या एका रन आऊट बद्दल जॉन्टी ऱ्होड्सला “बेस्ट रन आऊट ऑफ ऑल टाइम” हा खिताब मिळाला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *