फॅशनेबल दिसण्यासाठी कुठेही टोचून घेत असाल, तर त्यापूर्वी या १० गोष्टी अवश्य जाणून घ्या

पिअर्सिंग ! आपल्या भाषेत टोचणे ! तसं तर ती आपली परंपरा आहे. पण तिची फॅशन कधी बनली ते आपल्याला कळलेच नाही. एक काळ होता, जेव्हा मुली कान किंवा नाक टोचायच म्हणलं की घाबरून जात.

पण आज मुळीच नाही, तर मुलेही कुल दिसण्यासाठी पिअर्सिंग करत आहेत. तसं यात काही वाईट नाही, पण तुम्हाला याच्याबद्दल योग्य माहितीही असायला हवी. कारण कधी कधी शरीरावर पिअर्सिंग करणे आपल्याला नुकसानदायकही होऊ शकते. त्यामुळे पिअर्सिंग करण्याआधी या दहा गोष्टी लक्षात ठेवा…

१) केवळ इतरांनी फॅशन केली म्ह्णून त्यांचे बघून पिअर्सिंग करण्याची घाई करू नका. अगोदर पिअर्सिंग बद्दल चांगल्या पद्धतीने माहिती करून घ्या. २) सुरुवातीला हे बघा की शरीराच्या ज्या भागावर तुम्ही पिअर्सिंग करणार आहात, तिथे ती तुम्हाला शोभून दिसेल का नाही ?

३) कित्येक लोकांना पिअर्सिंगमुळे ऍलर्जी सुद्धा होऊ शकते. म्हणून हे सुद्धा बघणे तितकेच गरजेचे आहे की आर्टिस्ट पिअर्सिंग साठी कोणत्या धातूचा वापर करत आहे.

४) जर तुमच्या शरीराची त्वचा नाजूक असेल तर पिअर्सिंगमुळे होणाऱ्या नुकसानाबद्दलही माहिती करून घ्या. ५) पिअर्सिंग करताना एखाद्या अनुभवी किंवा त्यात कुशल असणाऱ्या व्यक्तीकडूनच करून घ्या.

६) कित्येक ठिकाणी पिअर्सिंग बघून लोकांना मुलाखतीतुन बाद केले जाते, त्यामुळे पिअर्सिंग करण्यापूर्वी आपल्या व्यवसाय किंवा नोकरीचाही विचार करा. ७) कुठल्याही प्रकारचे संक्रमण आपल्या जीवावर बेतू शकते, त्यामुळे पिअर्सिंग करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

८) अनेक लोकांना बेंबीवर, डोळ्यांच्या भुवयांना, नाकाच्या पाळीला, मानेवर, ओठांना किंवा विशेषतः पॉर्न फिल्ममध्ये दाखवतात त्याप्रमाणे स्तनांच्या निप्पल्सला किंवा क्लिटोरसला पिअर्सिंग करायची हौस असते. पण आर्टिस्टच्या एका चुकीमुळे आपल्या शरीरात तांत्रिक बिघाडसुद्धा होऊ शकतो किंवा चुकून एखादी नसही दुखावू शकते; त्यामुळे जे काही करणार असाल ते काळजीपूर्वक विचार करून करा.

९) ज्या जागेवर पिअर्सिंग करणार असाल, ते केल्यांनतर संक्रमण होऊ नये म्हणून ती जागा त्वरित डेटॉलने साफ करून घ्या. १०) तुमची इच्छा असेल तरच पिअर्सिंग करा, केवळ फॅशनेबल किंवा कुल दिसण्यासाठी नको.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *