आसामात या दुर्मिळ प्रकारच्या चहापत्तीला लिलावात मिळाला आजपर्यंतचा सर्वात महाग दर

चहा हे खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे राष्ट्रीय पेय आहे. भारतातील कुठलेही राज्य असो, प्रांत असो; सर्व ठिकाणी दिवसाची सुरुवात चहानेच होते. “चायवाला” देशाचा प्रधानमंत्री इथपासून ते “चाय पे चर्चा” अशा वेगवेगळ्या ठिकाणी चहा हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे.

काळानुसार चहामध्ये लेमन टी, आईस टी, ग्रीन टी, ब्लॅक टी, इत्यादि वेगवेगळे प्रकार येत गेले, पण चायपत्ती मात्र तीच आसामवाली रहिली. अशाच एका चहापत्तीला आसामात आजपर्यंतचा विक्रमी दर मिळाला आहे. पाहूया एक वेगळा विषय…

कोणत्या चहापत्तीला मिळाला एवढा महाग दर ?

आसाम मध्ये आढळणारी दुर्मिळ अशी मनोहारी गोल्ड टी ही चहापत्ती आजपर्यंतची सर्वात महाग चहापत्ती म्हणून ओळखली जाते. आसामच्या गुवाहाटी येथे भरलेल्या चहापत्ती लिलाव केंद्रात ३० जुलै २०१९ रोजी एक किलो मनोहारी गोल्ड चहापत्तीला ५०००० रुपयांची विक्रमी बोली लागली.

मागच्या वर्षी याच चहाला ३९००० रुपये प्रति किलोचा उच्चांकी दर मिळाला होता. परंतु आतापर्यंतचा सर्वात महाग चहापत्तीचा विक्रम २०१८ मध्ये अरुणाचल प्रदेशातील डोनी पोलो टी इस्टेट यांच्या गोल्डन नीडल व्हरायटीच्या नावावर होता, ती चापटी ४०००० रुपये प्रति किलोने विकली गेली होती.

फक्त ५ किलोच चहापत्ती तयार करण्यात आली होती

आसामच्या वरच्या पट्ट्यातील दिब्रुगढ येथील मनोहारी टी इस्टेटचे मालक राजन लोहिया यांनी सांगितले की, या प्रकारची केवळ ५ किलो चहापत्ती तयार करण्यात आली होती. ही चहापत्ती तयार करणे हे खूप कठीण काम आहे, कारण हवामान साथ देत नाही.

ही चहापत्ती पानांपासून नाही, तर छोट्या कळ्यांपासून बनवण्यात आली आहे. मागच्या ५ वर्षांपासून यावर काम सुरु होते. या कळ्या अत्यंत नाजूक असल्याने त्यांना खूप काळजीपूर्वक तोडावे लागते. जगात आसाम, दार्जिलिंग आणि निलगिरी येथील चहाला सर्वाधिक मागणी आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *