चंद्रावर ५ एकर जमीन असणारा हा भारतीय आहे तरी कोण ?

आपल्या गर्लफ्रेंडसाठी चाँद तारे तोडून आणण्याची भाषा करणारे कित्येक रोमिओ आपण बघितले असतील. चंद्रावर मधुचंद्र करण्याची स्वप्ने कित्येकांनी बघितली असतील. आता भारताने चंद्रावर चांद्रयान -२ मोहीमही काढली आहे. चंद्र माणसाच्या कवेत यायला लागला आहे.

अशामध्ये एका भारतीय व्यक्तीने चंद्रावर आपली ५ एकर जमीन असल्याचा दावा केला आहे आणि आपण आपले उरलेले आयुष्य आपल्या फॅमिलीसोबत चंद्रावर घालवणार असल्याचीही आशा त्या व्यक्तीला आहे.

हा भारतीय आहे तरी कोण ?

चंद्रावर आपली ५ एकर जमीन असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय व्यक्तीचे नाव आहे राजीव बागडी ! ते हैद्राबाद येथील रहिवासी असून न्यूमरॉलॉजिस्ट, ऍस्ट्रोलॉजिस्ट आणि शेअर मार्केट अनॅलिस्टही आहेत. The Minute News च्या बातमीनुसार २००३ मध्ये आपण चंद्रावर ५ एकर जमीन खरेदी केल्याचा दावा राजीव बागडींनी केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, २००३ मध्ये अमेरिकी वेबसाईट Lunar Registry च्या माध्यमातून चंद्रावर १४० अमेरिकी डॉलर म्हणजेच ९६४० रुपयांत त्यांनी ही जमीन खरेदी केली होती.

कशी केली होती खरेदी ?

राजीव बागडींनी इंटरनेटवर एक जाहिरात पाहिली होती, त्यात लिहले होते, “Gift a plot for your loved ones”. राजीव शेअर मार्केट अनॅलिस्ट असल्याने त्यांना जोखीम घ्यायला आवडत होते आणि त्यांनी चंद्रावर जमीन घेण्याची जोखीम स्वीकारली. कायदेशीररित्या राजीवकडे जमीन खरेदीचे रेकॉर्डही उपलब्ध होते. न्यूयॉर्कच्या “लुनर रजिस्ट्री” नुसार राजीव यांना चंद्रावरील “Mer Imbrium” क्षेत्रात ५ एकर जमिनीचे मालक आहेत. राजीव यांच्या माहितीनुसार त्यांच्या चुलतभाऊ ललित मोहटा यांचीही चंद्रावर जमीन आहे.

खरंच चंद्रावर जमीन घेता येते का ?

तसं व्यावहारिकदृष्ट्या हे अशक्य आहे. कारण १९६७ मध्ये अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांदरम्यान Outer Space Treaty (OST) करारानुसार कुठल्याही देशाला किंवा व्यक्तीला चंद्रावरच्या जमिनीचा मालक होऊ शकत नाही. त्यामुळे राजीव बागडी यांनी कितीही दावा केला तरी त्यांना चंद्रावर मालकी सांगता येणार नाही.

पण राजीव बागडी यांनी तर आपल्या नातवाने आपल्या या निर्णयाबद्दल आपली स्तुती करावी असे स्वप्न बघितले आहे. आपल्या फॅमिलीला घेऊन चंद्रावर राहायला जाण्याचेही त्यांनी स्वप्न बघितले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *