चुकूनही इन्स्टॉल करू नका हे ऍप, होऊ शकते ऑनलाईन फसवणुक..

जसजसे ऑनलाईन बँकिंग, स्मार्टफोन आणि ऍपचे तंत्रज्ञान बदलत चालले आहे, तसतसे फसवणुकीच्या पद्धतीही आधुनिक होत चालल्या आहेत. फसवणूक आणि लूट होऊ द्यायची नसेल तर सावधगिरी आणि सतर्कतेने राहावे लागेल. सायबर लुटारू यावेळेस वेगवगेळ्या ऍपच्या माध्यमातून मोबाईल नेट बँकिंग वापरणाऱ्या युजर्सना निशाणा बनवत आहेत. HDFC ही खाजगी बँक सुद्धा आपल्या ग्राहकांना एक लिंक पाठवून त्यात AnyDesk नावाच्या ऍपच्या माध्यमातून कशी फसवणूक केली जाते याची माहिती देत आहे.

फ्रॉड कसे मिळवतात तुमच्या स्मार्टफोनवर नियंत्रण ?

सुरुवातीला अमुक बँक किंवा कंपनीचा एजंट म्हणून ग्राहकाला फ्रॉडचा एक कॉल येतो. ग्राहकाला मोबाईल बँकिंग वापराच्या बाबतीत विचारले जाते. त्यांनतर बँकेच्या ऍपमध्ये काहीतरी घोटाळा असल्याचे सांगुन काही दिवस त्रास सोसावा लागेल असे सांगितले जाते. तोपर्यंत प्ले स्टोअर किंवा अमुक ऍप स्टोअर वेबसाइटवरून APK ऍप डाउनलोड करायला सांगितले जाते. ते ऍप इन्स्टॉल केले की मोबाईलवर एक कोड येतो, तो शेअर करायला सांगितला जातो. त्यांनतर ऍपमध्ये काही परमिशन अप्रूव्ह करायला सांगतात.

फ्रॉड अशी करतात लूट

तुम्ही एकदा का परमिशन अप्रूव्ह केली की तुमचा स्मार्टफोन फ्रॉडच्या नियंत्रणात जातो. फोनमध्ये सेव्ह केलेला पिन, OTP, ट्रांजेक्शन डिटेल्स फ्रॉडकडे जातात. त्यांनतर तो फ्रॉड आपल्या नम्बरवर अनेक SMS पाठवतो. ग्राहकाला तो मेसेज दुसऱ्या कुठल्यातरी नंबरवर फॉरवर्ड करायला सांगितले जाते. त्याद्वारे फ्रॉड तुमचा UPI रजिस्टर्ड मोबाईल नंबर ट्रेस करून अकाउंट बद्दल माहिती मिळवतात.

काहीवेळेस फ्रॉड ग्राहकाच्या VPA, नेट बँकिंग लॉगिन आयडीवर रिक्वेस्ट पाठवून ग्राहकाला ती Accept करायला सांगतात. त्याबद्दल आपल्याला क्रेडिट स्कोअर किंवा रिफंड मिळेल असे सांगितले जाते. इथून मग तुमच्या अकाउंट मधून पैसे गायब व्हायला सुरुवात होते.

फसवणुकीपासून कसे वाचावे ?

स्वतःला बँक किंवा कंपनीचा एजंट म्हणून सांगणाऱ्या आणि कुठले ऍप डाउनलोड करायला सांगणाऱ्या सगळ्या फोन कॉल्सपासून सावध रहा. तुम्हाला कुणीही तुमच्या अकाउंटचा OTP, पिन किंवा नेट बँकिंग पासवर्ड मागितला तर देऊ नका.

नेट बँकिंग संबंधित इतर कुठीही थर्ड पार्टी ऍप काढून टाका. मोबाईल बँकिंग संबंधित ऍपला लॉक वापरा. अकाउंट सोबत जोडलेल्या मोबाईल नंबरवर कुठलाही संशयित कॉल आल्यास त्याची पोलिसात तक्रार करा.

हे करू नका

कुठल्याही वेबसाईट किंवा ऍपवर आपला बँकिंग पासवर्ड किंवा OTP टाकू नका. UPI नंबर, डेबिट-क्रेडिट कार्ड, CVV, डेबिट कार्ड व्हॅलिडिटी, OTP,ATM पिन, बँक अकाउंट नंबर ही माहिती कुणाला देऊ नका.

कुठलेही थर्ड पार्टी ऍप डाउनलोड करू नका. बँक एजंट सांगून कुणी तुम्हाला SMS पाठवला तर कुठेही दुसऱ्या नंबरवर फॉरवर्ड करू नका. गुगलच्या भरोशावर कुठल्या बँक किंवा टेलिकॉम कंपनीचा नंबर शोधून त्यांना आपली माहिती देत बसू नका.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *