जगातील सर्वोत्कृष्ट फिल्डर असलेला हा खेळाडू बनणार भारताचा फिल्डिंग कोच!

टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचा कार्यकाळ वर्ल्ड कपनंतर संपला होता. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा देखील कार्यकाळ संपला आहे. BCCI सध्या नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचा कार्यकाळ ४५ दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. लवकरच टीम इंडियाला नवीन क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मिळणार आहे.

भारताचा हा प्रशिक्षक जगातील सर्वात चपळ क्षेत्ररक्षक म्हणून प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्स हा असू शकतो. जॉन्टी ऱ्होड्सने भारतीय संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होण्यासाठी इच्छूक असून त्याने या पदासाठी बीसीसीआयकडे अर्ज केला आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.

जॉन्टी ऱ्होड्सने आयपीएलच्या गेल्या ९ मोसमांत मुंबई इंडियन्स संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे मात्र कोणत्याही राष्ट्रीय संघासोबत त्याने प्रशिक्षक म्हणून काम पाहिलेले नाही. त्याने सलगपणे आयपीएलमध्ये मुंबईचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं आहे.

प्रशिक्षकपदासाठीच्या अटीनुसार राष्ट्रीय टीमसोबत काम केल्याचा अनुभव नसल्यास किमान आयपीएलमध्ये ३ वर्षांचा प्रशिक्षकपदाचा अनुभव असण्याची अट घालण्यात आली आहे. या सर्व अटींची पूर्तता जॉन्टी ऱ्होड्स करत असल्याने त्याला क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होण्यास कुठलीच अडचण येणार नाही असेच दिसते.

तर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनण्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने भारतीय टीमकडून किंवा आयपीएल स्पर्धेत किमान तीन वर्ष खेळलं पाहिजे. त्यामध्ये या खेळाडूने ३० टेस्ट किंवा ५० वनडे मॅच खेळलेल्या पाहिजेत. तसेच अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय हे ६० वर्षांपेक्षा कमी असलं पाहिजे आणि किमान दोन वर्षांचा आंतरराष्ट्रीय अनुभव त्याच्याकडे असला पाहिजे. प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत ही ३० जुलै आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *