रस्त्यावर भीक मागणाऱ्या दिव्यांग तरुणाला नितीन नांदगावकरांनी बनवले व्यावसायिक! बघा व्हिडीओ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन नांदगावकर हे नेहमीच चर्चेत असतात. मुंबईत अनेक जणांना न्याय देण्याचं काम ते करतात. त्यांचे नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांचा सध्या एक व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नांदगावकर यांच्या हस्ते एका तरुणाला दिव्यांगांची सायकल भेट देताना दिसत आहेत. नांदगावकर यांच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओनुसार माहिमच्या दर्ग्याजवळ भीक मागणाऱ्या तरुणाला स्वावलंबी बनवण्यासाठी ही सायकल भेट देण्यात आल्याचे म्हटले आहे.

या व्हिडिओमध्ये फुग्यांनी सजवलेली दिव्यांगांची सायकल सचीन नावाच्या तरुणाला भेट देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्याच्या कॅप्शनमध्ये ‘मै सिर्फ जरिया हूँ देने वाले हजारो हात है’ असं नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

ट्रेन अपघातामध्ये दोन्ही पाय गमावलेला सचिन माहिमच्या दर्ग्याजवळ भीक मागायचा. ही गोष्ट नांदगावकर यांना समजल्यानंतर त्यांनी या मुलासाठी सायकल दान करण्यासंदर्भात सोशल मिडियाच्या माध्यमातून आवाहन केले. या आवाहनाला चांगला प्रतिसाद आला. शंभरहून अधिक लोकांनी सचीनला सायकल देण्याची तयारी दाखवली.

नांदगावकर यांनी लकी ड्रॉच्या माध्यमातून अमय तावडे या वसईतील मुलाची निवड करुन त्याने दिलेली सायकल स्वत:च्या हस्ते सचिनला दिली. यासोबत त्यांनी सचिनला एक प्रेमाने दम देखील दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. ‘जर मला तू या पुढे भीक मागताना दिसला तर या सायकलचा उपयोग झाला नाही असं समजेल. तुला भीक मागूनच पैसा कमावायचा असेल तर ते तुझ्यावर’ असं नांदगावकर म्हणतात.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *