बाजारातील नकली सौंदर्य प्रसाधने ओळखण्याच्या १० ट्रिक्स

मेकअप म्हणजे मुलींच्या सर्वात आवडीची गोष्ट ! त्यासाठी कितीही पैसे खर्च करण्याची त्यांची तयारी असते. पण त्याच सौंदर्य प्रसाधनांमध्ये त्यान्ची फसवणूक झाली की पैसे तर जातातच, त्याचबरोबर त्यांचा चेहराही खराब होतो. यामागचे कारण म्हणजे मार्केटमध्ये असणारी नकली सौंदर्य प्रसाधने ! आता प्रश्न पडतो की ही नकली सौंदर्य प्रसाधने कशी ओळखायची ? पुढे दिलेल्या १० ट्रिक्स वापरून तुम्ही नकली सौंदर्य प्रसाधने सहज ओळखू शकता.

१) Colorpop Ultra Matte Lip च्या डुप्लिकेट प्रोडक्टसचे सगळे शब्द मल्टी कलर्स असतात. २) Jefree Star Lipstick च्या ओरिजनल पॅकेटवर सोनेरी स्टार असतात, तर त्याच्या डुप्लिकेट पॅकेट्सवरील स्टार अधिक गडद असतात.

३) ओरिजनल Mac Lipstick जाड असते, तर डुप्लिकेट लिपस्टिक जाड आणि थोडी लांब असते. ४) Mac च्या Sheertone Blush च्या डबीच्या पॅकेजिंग डिझाईनमध्ये अंतर असते, तर डुप्लिकेट प्रोडक्टच्या पॅकेजिंग डबीवर अंतर नसते.

५) ओरिजनल Mac ब्रॅण्डच्या ब्रशची स्टिक पातळ आणि लांब असते, तर डुप्लिकेट मोठी असते. ६) ओरिजनल ब्रँडच्या Eyeshadow च्या शेड्सवर त्यांची नावे लिहलेली असतात.

७) Maybelline च्या ओरिजनल आणि डुप्लिकेट प्रोडक्टमधील फरक त्याच्या ट्यूबवरील अक्षरांच्या लिखावटीवरून ओळखता येतो. ८) Maybelline Colosal काजळाच्या डुप्लिकेट प्रोडक्टच्या पॅकेजिंगच्या कॅपचे वरचा भाग सपाट असतो, ओरिजनल प्रॉडक्टच्या पॅकेजिंगच्या बाबतीत तोच भाग आतल्या बाजूने खोलगट असतो.

९) Versace परफ्युम घेण्यापूर्वी त्याची पॅकेजिंग आणि लिखावट बघून घ्यावी. त्याचे झाकण आणि फॉन्ट यावरून ओरिजनल आणि डुप्लिकेटमधील फरक लक्षात येईल. १०) Chanel या ब्रॅण्डच्या प्रॉडक्टच्या बाबतीतही पॅकेजिंग आणि फॉन्टवरून ओरिजनल आणि डुप्लिकेट प्रोडक्ट ओळखता येते.

११) Boi-Oil ब्रॅण्डच्या बाबतीत पॅकेजिंगवर छापलेला ऑइल ड्रॉप ओरिजिनलमध्ये गडद असतो, तर डुप्लिकेटमध्ये कमी थोडा फिकट असतो. थोडीशी सावधगिरी बाळगून प्रॉडक्टच्या पॅकेजिंग, डिझाईन, फॉन्ट, कलर यांचे निरीक्षण केले तर ओरिजनल आणि डुप्लिकेट प्रोडक्टस ओळखता येतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *