अबब! एक व्यक्ती आयुष्यातील एवढा वेळ बाथरूममध्ये घालवतो..

आजकाल बाथरूममध्ये सर्वजण बराच वेळ घालवतात. परदेशात बाथरूममध्ये असताना लोकं काम देखील करत बसतात. अगदी लॅपटॉप घेऊन लोकं आपला वेळ वापरतात. बाथरूमला नवनवीन आयडिया मिळण्याचं स्थान देखील म्हंटलं जाते. अनेकदा तुम्ही ऐकलं असेल कि बाथरूममधून नवीन आयडिया मिळाली.

बाथरूमध्ये शांतता देखील मिळते. बाथरूममध्ये घालवण्यात येणाऱ्या वेळाविषयी एका संस्थेनी एक सर्वे केला असून त्यामध्ये अनेक बाबी समोर आल्या आहेत. बाथरूममध्ये सगळ्यात जास्त शांतता किंवा आराम मिळतो हे या सर्वेमधून निष्पन्न झाले आहे. इंग्लंडमध्ये हा सर्वे करण्यात आला आहे. बाथरूमवरच हा सर्वे करण्यात आला आहे.

एवढेच नाही तर या सर्वेमधून एक व्यक्ती आयुष्यातील किती वेळ बाथरूममध्ये घालवतो हे देखील समोर आले आहे. U.K. home-goods outlet B&Q कडून साधारण २ हजार लोकांवर हा सर्वे करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये समोर आले आहे कि एक व्यक्ती आयुष्यातील सरासरी ४१६ दिवस बाथरूममध्ये घालवतो.

यामध्ये एक पुरुष हा ३७३ दिवस बाथरूममध्ये घालवतो म्हणजेच दिवसाला २३ मिनिटं बाथरूममध्ये जातात. तर एक स्त्री ४५६ दिवस म्हणजे दिवसातील २९ मिनिटे बाथरूममध्ये घालवतात. या सर्व्हेमध्ये अनेक प्रश्नांचा उलगडा झाला आहे. या सर्व्हेमध्ये समोर आलं आहे कि १० पैकी ७ लोकांना आपलं बाथरूम इतर कोणी वापरलं तर राग येतो.

या सर्व्हेमध्ये बाथरूममध्ये असताना सर्वात जास्त राग कशाचा येतो हा प्रश्न विचारण्यात आला. त्यामध्ये एक तृतीयांश लोकांना टॉयलेट पेपर संपल्यावर जास्त राग येतो. तर २ हजार पैकी २०० लोकांचं म्हणणं आहे कि बाथरूमच्या नालीत केस दिसल्यावर त्यांना खूप राग येतो. २९ टक्के महिलांनी बाथरूम घाण करण्यामागे पुरुष असतात असं सांगितले आहे.

कोणाला टाळायचं असेल तर त्यासाठी अनेक जण बाथरूमचा वापर करतात असे देखील समोर आले आहे. १० टक्के लोक बाथरूममध्ये स्वतःशी बोलतात तर १० टक्के लोक बाथरूममध्ये बसून इतरांना भांडत असतात. भारतात अजून तरी असा सर्वे झाला नाहीये. पण असा सर्वे झाला तर नक्कीच गमतीशीर माहिती समोर येईल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *