बेबी प्रॉडक्ट बनवणारी ही कंपनी न जाणो किती जणांच्या प्रेतांवर उभारली आहे…

शेकडो वर्षांपूर्वी व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने २०० वर्षांपर्यंत भारतावर राज्य केल्याचे उदाहरण आपल्या सर्वांना माहीत आहे. १९४७ मध्ये भारत इंग्रजांपासून तर स्वतंत्र झाला, पण विदेशी कंपन्यां अजूनही आपल्याला गुलाम मानतात. जास्त कशाला, बेबी प्रॉडक्ट बनवणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचेच उदाहरण घ्या. कित्येक लोकांच्या आयुष्याशी खेळून ही कंपनी आज उभी आहे. पाहूया या कंपनीचे काळे कारनामे…

भारतात विकले सदोष प्रोडक्टस

जॉन्सन अँड जॉन्सन या अमेरिकेच्या प्रसिद्ध औषधी उत्पादन कंपनीने २००३ ते २०१३ यादरम्यान भारतात ४७०० हिप रिप्लेसमेंट सिस्टम विकल्या. ही सिस्टम कंबर आणि गुडघ्यांच्या सांध्यादरम्यान बसवण्यात येते. मात्र याच्या डिझाईनमध्येच गडबड होती. त्यामुळे भारतात अनेक लोकांना सर्जरी केल्यांनतर खूप त्रास झाला.

सद्यस्थितीत ७१ लोक कंपनी विरोधात कायदेशीर लढा देत आहेत. ४ लोकांचा यात मृत्यू झाला आहे. २०१८ च्या फेब्रुवारी महिन्यात ही गोष्ट समोर आली. खरं तर २०१७ मध्येच या कंपनीचे पितळ उघडे पडायला पाहिजे होते, कारण २०१७ मध्येच समजले होते की या कंपनीने भारतासोबतच विदेशातही सदोष प्रॉडक्ट्स विकले आहेत.

महाराष्ट्राच्या एका माजी अधिकाऱ्याचे गंभीर आरोप

२०१७ मध्ये महाराष्ट्र अन्न व औषधी व्यवस्थापनाचे माजी आयुक्त महेश झगडे यांनी भारताच्या ड्रग कॅट्रॉलर जनरल ऑफ इंडिया यांच्यावर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीवर कारवाईत कसूर केल्याचा आरोप केला होता.

२०१० मध्ये ज्या कंपनीने आपले प्रोडक्टस खराब असल्याने परत मागवले होते, त्याच कंपनीच्या त्याच प्रोडक्टसला भारतात विक्रीसाठी लायसन्स कसे दिले जाते हा त्यांचा आरोप होता. त्या कोर्टात गेला आणि कोर्टाने कंपनीला ६७ पेशंटला २५-२५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

विदेशात ६००० खटले

आपल्या सदोष प्रोडक्टस बद्दल जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीवर जवळपास ६००० खटले सुरु असून ते ६५०० कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यास तयारही झाले आहेत. पण भारतात मात्र ते नुकसान भरपाई करण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत.

सुप्रीम कोर्टात कम्पनी तारखा मागून वेळ ढकलत आहे. ७१ भारतीय लोकांच्या आयष्याशी खेळणाऱ्या कंपनीला अमेरिकेत मात्र ६५०० कोटी रुपये नुकसान भरपाई भरण्यात काहीही अडचण वाटत नाही. हा दुटप्पीपणा जॉन्सन अँड जॉन्सन करत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *