परत एकदा टेस्ट क्रिकेटमध्ये दिसणार धोनीची ७ क्रमांकाची जर्सी, पण कोणता खेळाडू घालणार ?

महेंद्रसिंग धोनी हे आता क्रिकेट विश्वातील केवळ एक नाव राहिले नाही. भारताचा सर्वात यशस्वी कॅप्टन, सर्वोत्कृष्ट विकेटकिपर, जबरदस्त फिनिशर आणि कॅप्टन कुल..! अशी कित्येक नावे धोनीला मिळाली आहेत. कदाचित तितकी नावे क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिन तेंडुलकरलाही मिळाली नसतील.

२८ वर्षे वर्ल्ड कपसाठी तरसलेल्या भारतीय क्रिकेट प्रेमींना २०११ मध्ये वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद साजरा करण्याची संधी देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचे भारतीय क्रिकेटसाठी मोठे योगदान आहे.

मैदानावर परत दिसणार ७ नंबरची जर्सी

धोनी आणि ७ नंबरची जर्सी हे अतूट नातं आपण सर्वांनी मैदानावर पहिले आहे. ७ नंबरची जर्सी ही धोनीची ओळखच बनली होती. मात्रा आता धोनीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याने त्याची ही टेस्ट क्रिकेट जर्सी रिकामीच आहे.

भारतीय संघातील टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या इतर कुठल्याही खेळाडूने जर BCCI कडे मागणी केली, तर त्याला ही ७ नंबरची जर्सी उपलब्ध होऊ शकते. याची घोषणा स्वतः BCCI नेच केली आहे.

कोणत्या खेळाडूला मिळणार ७ नंबरची जर्सी ?

जरी BCCI ने याची घोषणा केली असली तरी BCCI च्या अधिकाऱ्यांनी ७ नंबरच्या जर्सीच्या बाबतीत सांगितले आहे की, “आम्हा खात्री आहे या क्रमांकाच्या जर्सीची क्वचितच एखादा खेळाडू मागणी करेल, पण तरीही आम्ही अधिकृतरीत्या हा जर्सी क्रमांक खुला ठेवला आहे.”

अंदाज वर्तवले जात होते की, ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरची १० क्रमांकाची जर्सी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त करण्यात आली, त्याप्रमाणे धोनीची ७ क्रमांकाची जर्सीही टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त करण्यात येईल. पण BCCI ने हा जर्सी नंबर खुला ठेवून क्रिकेट फॅन्सला आश्चर्याचा धक्का दिला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *