नाना पाटेकरांचे २५ एकरात आहे आलिशान फार्महाऊस, जगतात साध्या पद्धतीने जीवन..

नानांनी मकरंद अनासपुरेंना सोबत घेऊन नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नानांनी शेतकऱ्यांसाठी मोठी चळवळ उभी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात सरसावणाऱ्या आणि त्यांच्यात सामान्यांप्रमाणे मिसळणाऱ्या नाना पाटेकर यांनी त्यांच्या कमाईतील ९० टक्के रक्कम समाजसेवेसाठी खर्च करतात.

नाना पाटेकर हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. आपला दमदार अभिनयाने रसिकांची मने जिंकणाऱ्या आणि एक उत्तम माणूस असणाऱ्या नाना यांच्यावर मागे तनुश्री दत्ताने आरोप केले होते. या आरोपात त्यांच्या चाहत्यांना मात्र तथ्य वाटलं नाही. नाना हे सर्वसामान्यांना हवेहवेशे वाटणारे अभिनेते आहेत सोबतच ते एकदम साध्या पद्धतीने देखील जीवन जगतात.

कोट्यवधींचे धनी तरी जगतात साधं जीवन-

नाना यांच्या नावावर कार, फार्महाउस आणि इतर कोट्यवधीच्या संपत्तीचा समावेश आहे. पण नाना हे अत्यंत साधेपणाने जीवन जगतात. नाना सामान्य आयुष्य जगणे पसंत करतात. नानांना शहरातील गर्दी फारशी आवडत नाही. त्यांना शहराच्या गर्दीपासून जेव्हा दूर जायचं असतं तेव्हा ते आपल्या फार्महाउसवर जातात.

नाना पाटेकर यांचे पुण्याच्या खडकवासलामध्ये २५ एकरांमध्ये पसरलेले शानदार फार्महाऊस आहे. काही चित्रपटांचं शूटिंग देखील या फार्महाउसवर झालं आहे. सात खोल्यांच्या या फार्महाऊसमध्ये एक मोठा हॉल आहे. फर्निचर आणि टेराकोटा फ्लोरने नाना यांचं हे फार्महाऊस सजलं आहे. याशिवाय नाना यांच्याकडे ८१ लाख रुपयांची ऑडी-Q7 कार आहे. तसंच १० लाखांची महिंद्रा स्कॉर्पियो आणि दीड लाख रु. किंमतीची रॉयल इनफिल्ड क्लासिक-३५० आहे.

नानांना शेतीची आहे आवड-

फर्निचर आणि टेराकोटा फ्लोरने नाना यांचं हे फार्महाऊस सजलेलं आहे. नाना आपल्या या फार्महाऊसवर धान्य, गहू आणि हरभऱ्याचीही शेती करतात. याशिवाय तिथे मोठ्या प्रमाणात गायी-म्हशी देखील आहेत.

त्यामुळेच आलिशान जीवन न जगता अत्यंत साधेपणाने आपल्या आईसोबत राहतात. नाना त्यांच्या आईंसोबत ७२० चौ. फुटाच्या वन बीएचके फ्लॅटमध्ये राहतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *