पाच सुवर्णपदक जिंकणाऱ्या हिमा दासने देशवासीयांसमोर ठेवली ही मागणी! बघा व्हिडीओ

ढिंग एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या भारताच्या युवा धावपटू हिमा दास हिने या महिन्यात एकापाठोपाठ एक असे ५ सुवर्णपदक पटकावून सोन्याची कामगिरी केली आहे. तिच्या कामगिरीमुळे प्रत्येक भारतीयांची मान उंचावली आहे. हिमा दासीचे वय केवळ १९ वर्ष आहे, पण तिने या वयात हिमालयाएवढी कामगिरी केली याचे जास्त कौतुक आहे.

भारताचा तिरंगा जेव्हा फडकत भारताचे राष्ट्रगान धून वाजवत जेव्हा कुठल्या भारतीयाला सुवर्णपदक गळ्यात घातले जाते, तेव्हा तो क्षण अभिमानाने पाहण्यासारखा असतो. हिमाने देशवासियांना ती संधी अनेकदा दिली आहे.

हिमा दासने मानले सर्वांचे आभार

हिमाने २ जुलैला पोलंड, ७ जुलैला कुटनो (पोलंड), १३ जुलैला क्लांदो, १७ जुलैला टबोर आणि २० जुलैला प्राग ऍथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक मिळवली आहेत. आपल्याला प्रोत्साहन दिल्याबद्दल देशवासीयांचे तिने आभार मानले आहेत.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, क्रिकेटर सचिन तेंडुलकर, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनाही तिने धन्यवाद दिले आहेत. तत्पूर्वी राष्ट्रपती, प्रधानमंत्री, खेळाडू, बॉलिवूड स्टार आणि अनेक भारतीय नागरिकांनी हिमाला शुभेच्छा दिल्या होत्या.

पाच सुवर्णपदक जिंकणाऱ्या हिमा दासीने देशवासीयांसमोर ठेवली ही मागणी

पाच सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी करणाऱ्या हिम दासने ट्विटरच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करताना एक मागणी केली आहे. ती म्हणते “आता पर्यंत झालेल्या सर्व स्पर्धा माझ्यासाठी सराव सामन्यासारख्या होत्या.

माझे लक्ष जागतिक अजिंक्यपदाकडे आहे. तुम्ही सर्वजण मला असेच आशीर्वाद देत रहा, मी नक्कीच अशीच चांगली खेळत राहीन.” हिमाने देशवासियांना आशीर्वाद मागितला आहे. तिच्या पाठीशी आपण सर्व भारतीय लोक उभे आहेत, हिमाला वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सर्वांकडून शुभेच्छा !

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *