ईस्रोचे पहिले कार्यालय कसे सुरु झाले होते हे वाचून विश्वास बसणार नाही!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) एकामागून एक भारताच्या सुवर्णगाथेचे यशस्वी पान लिहीत आहे. आपल्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी मंगलयान मोहीम, एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडण्याचा विश्वविक्रम, चंद्रावर २ मोहिमा, इत्यादि अनेक पराक्रम आज ईस्रोच्या नावावर जमा आहेत.

आज आपल्या कामगिरीने ईस्रोने जगात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण कधीकाळी याच ईस्रोने सायकल आणि बैलगाडीतून आपल्या उपग्रहांची वाहतूक केली होती हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. चला तर त्या सत्याचा उलगडा करूया…

अशी शोधली ईस्रो कार्यालयासाठी जागा

१९६२ च्या दरम्यान डॉ.विक्रम साराभाई आणि डॉ.होमी भाभा अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना करण्यासाठी एक जागा शोधत होते. केरळमधील थुंबा गावी येऊन त्यांचा शोध थांबला. हे गाव पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्ताच्या जवळ असून अंतराळ संशोधनासाठी उपयुक्त असल्याने त्या गावाची निवड करण्यात आली.

त्या भागात हजारो मच्छिमार कुटुंब राहत होते, तसेच जवळच एक सेंट मेरी मैगडेलिन नावाचा चर्च होता. त्यामुळे संस्थेसाठी जागा मिळण्यात अडचण निर्माण झाली. डॉ.साराभाई चर्चच्या बिशपला भेटले. त्यांना विषय सांगितला.

असे सुरु झाले एका चर्चमध्ये ईस्रोचे पहिले कार्यालय

दुसऱ्या दिवशी प्रार्थनेच्या वेळी बिशपने जमलेल्या लोकांना विचारले की, “जर अध्यात्म आणि विज्ञान दोन्हीही माणसाचे जीवन समृद्ध करण्यासाठीच काम करत असतील तर आपले घर डॉ.विक्रम साराभाई यांच्या वैज्ञानिक कार्यासाठी द्यायचे का ?” त्यावेळी एका सुरत सर्वांनी “आमीन” म्हणत परवानगी दिली. मासेमार आणि स्थानिकांना रोजगाराचे वचन देण्यात आले. अशा पद्धतीने थुंबाजवळील ६०० एकरांच्या परिसरात असणाऱ्या एका चर्चमध्ये ईस्रोचे कार्यालय सुरु झाले. आज भरभराट ईस्रोची १३ केंद्र आहेत.

सायकल आणि बैलगाडीतून सुरु झाला ईस्रोचा यशस्वी प्रवास

आपल्या अंतराळ प्रवासाची सुरुवात हा खरं तर एक आगळावेगळा प्रसंग आहे. २१ नोव्हेंबर १९६३ रोजी भारताने अमेरिकेकडून घेतलेले “नाईक अपाचे” नावाचे रॉकेट प्रक्षेपित केले होते. हे रॉकेट प्रक्षेपित करण्यासाठी भारताने नारळांच्या झाडांमध्ये आपले लाँचिंग पॅड बनवले होते. दुर्बिणीशिवाय उघड्या डोळ्याने रॉकेटचे निरीक्षण आणि रॉकेटच्या धुराच्या साहाय्याने त्याचे ट्रॅकिंग करण्यात आले होते.

हे रॉकेट सायकलच्या कॅरेजवर ठेवून लाँचिंग पॅडपर्यंत नेण्यात आले होते. त्यांनतर १९८१ मध्ये भारताने स्वदेशी बनावटीचा APPLE हा पहिला दूरसंचार उपग्रह एका बैलगाडीच्या माध्यमातून लाँचिंग पडेपर्यंत पोहोचवण्यात आला होता. आज बैलगाडीतून अधिक वजनाचे उपग्रह भारत अनराळात पाठवत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *