जोफ्रा आर्चरने वर्ल्डकपबद्दल चार वर्षांपूर्वी केलेली हि भविष्यवाणी बघून थक्क व्हाल!

काल क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत विश्वविजेतेपदावर आपले पहिल्यांदा नाव कोरले. ज्या देशाने जगाला क्रिकेट दिले त्याच देशाला विश्वचषक जिंकण्यासाठी अनेक वर्ष वाट बघावी लागली.

फायनलच्या सामन्यात अखेरच्या षटकापर्यंत रंगत बघायला मिळाली. विश्वविजेता कोण होणार, हे कुणीही सांगू शकत नव्हते. अटीतटीच्या झालेला हा सामना अखेर सुपर ओव्हरमध्ये गेला. पण सुपर ओव्हरमध्ये अखेर बाजी मारली ती इंग्लंडने. सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडपुढे विजयासाठी १६ धावांचे आव्हान ठेवले होते. पण न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये १५ धावा करता आल्या आणि इंग्लंडने विश्वचषक जिंकला.

न्यूझीलंडने इंग्लंडला दिलेले २४२ धावांचे लक्ष्य एकावेळी जड जाईल असे वाटत होते. इंग्लंडची धावांचा पाठलाग करताना २४ षटकांत ४ बाद ८६ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली आणि इंग्लंडचे आव्हान जीवंत ठेवले. इंग्लंडला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी १५ धावांची आवश्यकता होती. इंग्लंडने १४ धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला.

सुपरओव्हरमध्ये गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने १५ धावा केल्या. न्यूझीलंडने या धावांचा पाठलाग करताना पुन्हा १५ धावा केल्या आणि सामना पुन्हा बरोबरीत सुटला. पण आयसीसीच्या नियमांनुसार इंग्लंडने हा सामना जिंकला.

जाफ्रा आर्चरने केले होते ४ वर्षांपूर्वी हे भाकीत-

सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटल्यानं सर्वाधिक चौकारांच्या जोरावर इंग्लंडने बाजी मारली. इंग्लंडचा युवा गोलंदाज जोफ्रा आर्चरनं चार वर्षांपूर्वी या सामन्याचं भाकित केलं होतं आणि ते रविवारी तंतोतंत खरं ठरलं. त्यामुळे जोफ्राला ज्योतिषाचार्य म्हणून संबोधलं जात आहे.

जाफ्रा आर्चरने ट्विट केलेल्या जुन्या पोस्ट सध्या व्हायरल झाल्या आहेत. जाफ्रा आर्चरने १४ एप्रिल २०१३ ला ६ चेंडूत १६ धावा असे ट्विट केले होते. काल आर्चरनेच इंग्लंडकडून सुपरओव्हर टाकली आणि १५ धावा दिल्या. न्यूझीलंडला विजयासाठी ६ चेंडूत १६ धावांचीच गरज होती.

त्याने दुसरे ट्विट केलेले आहे २९ मे २०१४ ला. ज्यामध्ये लिहिले होते लॉर्ड्सवर जायची इच्छा आहे. त्याची हे भाकीतही खरे ठरले आणि इंग्लंडने लॉर्ड्सवर विजेतेपद मिळवले.

तर अजून एक ट्विट होते जे वाचून तुम्ही थक्क व्हाल. ५ जुलै २०१५ ला केलेल्या ट्विटमध्ये त्याने लिहिलं आहे सुपर ओव्हरमध्येही काहीच अडचण येणार नाही. अन हे ट्विट देखील खरे ठरले आणि इंग्लंडने सुपरओव्हरमध्येच सामना जिंकला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *