या शेतकऱ्याच्या पोरीने ११ दिवसांत पटकावलं तिसरं सुवर्णपदक

भारताची सुपरस्टार धावपटू हिमा दास सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हिमानं झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. हिमानं मागील ११ दिवसात तिसरं सुवर्णपदक जिंकले आहे. हिमानं मागच्या वर्षी २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक भरारी घेतली होती. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली होती.

पोलंड येथे झालेल्या स्पर्धेत हिमानं महिलांच्या २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. हिमा पाठीच्या दुखापतीशी संघर्ष करत आहे. या दुखण्यावर मात करत २३.६५ सेकंदाची वेळ नोंदवून तीन अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर तिने कुंटो अॅथलेटिक्स स्पर्धेत २३.९७ सेकंदाची वेळ नोंदवून एका सुवर्णपदकाची कमाई केली.

झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या स्पर्धेत तिने हा इतिहास रचला आहे. खासरेवर जाणून घेऊया कोण आहे हिमा दास..

हिमा दास हि आसामची असून तिचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झालेला आहे. २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली होती. हिमाचा जन्म नगांव जिल्ह्यातील कांधूलिमारी या गावात झाला. तिचे वडील रोनजीत दास हे शेतकरी आहेत.

तिचे आईवडील भाताची शेती करतात. हिमा शाळेत असताना मुलांसोबत फुटबॉल खेळायची. तेव्हापासूनच तिला खेळामध्ये आवड होती. पुढे जवाहर नवोदय विद्यालयाचे पीटी टीचर शमशुल हक यांनी तिला धावण्यासाठी तयार केले. त्यानंतर तिने जिल्हास्तरीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले.

हिमाचा प्रवास तिथून सुरु झाला आणि आज तिने हि सुवर्णकामगिरी करत इतिहास रचला आहे. एप्रिल २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या कॉमनवेल्थ मध्ये देखील तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *