आता ८ नाही तर १० संघामध्ये रंगणार युद्ध, आयपीएलमध्ये येणार हे दोन नवीन संघ !

पुढील वर्षीची इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा पुन्हा दहा संघांमध्ये होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील संघाची संख्या बीसीसीआय आठ वरुन दहा करणार असल्याची शक्यता आहे. यापूर्वी २०१० मध्ये देखील दहा संघ आयपीएल खेळले होते. त्यावेळी चांगलाच विवाद झाला होता. पण त्यानंतरच्या वर्षी मात्र हा फॉर्म्यूला रद्द करण्यात आला होता.

नव्या दोन संघांसाठी टाटा ( रांची, जमशेदपूर), अदानी ग्रुप ( अहमदबाद) आणि आरपीजी संजीव गोयंका ( पुणे) या कॉर्पोरेट्समध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. म्हणजेच पुढील आयपीलमध्ये आपल्याला रांची, जमशेदपूर, अहमदाबाद आणि पुणे या संघांपैकी दोन संघ खेळताना दिसणार आहेत.

टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने आयपीएलमध्ये संघ संख्या वाढवण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे. संघ संख्या वाढवण्याचा निर्णय पक्का असून याची टेंडर प्रक्रिया कशी राबवावी याबाबत चर्चा सुरू आहे.

मागील आठवड्यात आयपीएल फ्रँचायझी मालक आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये लंडन येथे एक बैठक झाली. त्यात २०२० च्या आयपीएलमध्ये दोन नवीन संघांचा समावेश करण्याचा मुद्दा ठेवण्यात आला आणि २०२१ मध्ये हे संघ खेळतील. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनीही बैठक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

या चार संघाव्यतिरिक्त लखनौ आणि कानपूर याही शहरातून संघ आयपीएलमध्ये खेळण्यास उत्सुक आहेत. २०१० च्या आयपीएलमध्ये कोची टस्कर्स आणि केरळचा संघ खेळला होता. हे दोन्ही संघ पुढच्या सिजनला बरखास्त करण्यात आले होते. हे दोन्ही संघ आता पुन्हा पुनरागमन करण्यास इच्छुक असणार आहेत.

पुणे सुपरजायंट्स संघाने यापूर्वी आयपील खेळले आहे. पुणेचे मालक संजीव गोयंकाही त्यामुळे पुढील आयपीएलसाठी उत्सुक आहेत शिवाय टाटा ग्रुपही जमशेदपूर फ्रँचायझी मैदानात उतरवण्यासाठी सज्ज आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *