विष्णुपुराणानुसार ही तीन कामे निर्वस्त्र होऊन करू नयेत

शास्त्र आणि पुराणात केवळ चमत्कार भरलेले नाहीत. माणसाच्या कल्याणासाठी त्यात अनेक नियम सुद्धा सांगण्यात आलेले आहेत. त्यामध्ये जेवणखाणापासून कपडे घालण्याच्या पद्धतीपर्यंत अनेक नियमांचा समावेश आहे. कारण कुठल्या न कुठल्या प्रकारे या गोष्टी आपल्या शारीरिक उर्जेला प्रभावित करत असतात. त्यामुळेच देवपूजा करत असताना कुठल्याही प्रकारचे शिवणकाम न केलेलीच वस्त्रे परिधान करण्याचा नियमी देण्यात आला आहे.

काय सांगितले आहे विष्णु पुराणात

शिवलेली वस्त्रे प्रापंचिक बंधनाचा अनुभव देत असतात तर न शिवलेली वस्त्रे स्वातंत्र्याचा बोध देत असतात अशी धारणा असल्यामुळेच विष्णु पुराणात शिवलेल्या वस्त्रांऐवजी न शिवलेली वस्त्रे परिधान करण्याचा नियम देण्यात आला आहे. वस्त्र परिधान करण्याच्या संदर्भात विष्णू पुराणात ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यानुसार सुख, शांती आणि कल्याण यांची अपेक्षा ठेवणाऱ्या माणसाने पुढील तीन कामे करताना निर्वस्त्र असू नये असा नियम सांगितला आहे. पाहूया त्या तीन गोष्टी…

या तीन गोष्टी करताना माणसाने निर्वस्त्र असू नये

१) विष्णु पुराणाच्या बाराव्या अध्यायात सांगितले आहे की स्नान करत असताना माणसाने निर्वस्त्र असू नये. श्रीकृष्णाने आपल्या लीलांमध्ये चीरहरण करून हाच संदेश दिला आहे, की निर्वस्त्र स्नान करण्याने जलदेवतेचा अपमान होतो.

२) रात्री झोपतानाही माणसाने निर्वस्त्र असू नये. त्यामुळे चंद्रदेवतेचा अपमान होतो. त्यासोबतच घरातले प्रियजन रात्री आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्यासाठी येत असतात, त्यामुळे त्यांच्यासमोर निर्वस्त्र असल्यास त्यांना शरमल्यासारखे वाटते. ३) विष्णू पुराणानुसार आचमन करतेवेळीही माणसाने निर्वस्त्र असू नये.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *