वर्ल्ड कप फायनलच्या तिकिटांवर भारतीय क्रिकेट फॅन्सचा कब्जा, न्यूझीलंडचा हा खेळाडू हैराण

१४ जुलै रोजी २०१९ च्या वर्ल्ड कपचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. सेमी फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. याचा सगळ्यात मोठा झटका भारतीय क्रिकेट फॅन्सला बसला आहे.

आपला भारतीय संघ फायनलमध्ये खेळेल अशी त्यांना आशा होती, म्हणून त्यांनी अगोदरच फायनल सामना बघण्यासाठी आपापले तिकीट विकत घेतले होते. पण आता भारतीय संघ फायनलला खेळणार नसल्याने या क्रिकेट फॅन्सचे सामना पाहणे आणि न पाहणे एकसारखंच आहे.

ज्या भारतीय क्रिकेट फॅन्स लोकांनी फायनल सामना बघण्यासाठी तिकिटे विकत घेतली होती, ते लोक आता फायनल मॅच बघायला जाणारच नाहीत. तिथे जाऊन कुठल्या दुसऱ्या देशाच्या नावाने चिअर करणे कुठल्याही भारतीय क्रिकेटप्रेमीला पटणार नाही. त्यामुळे सगळे लोक आता ट्विटर पासून फेसबुक, इंस्टाग्रामवर आपापला राग व्यक्त करण्यात व्यस्त आहेत. हे बघूनच इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावरील फायनल सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूंना वेगळीच चिंता लागून राहिली आहे.

न्यूझीलंडच्या जिम्मी निशमने ट्विट करून केली भारतीय क्रिकेटप्रेमींना विनंती

भारतीय क्रिकेट फॅन्सचा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यावर किती दबदबा आहे ते न्यूझीलंडच्या जिम्मी निशमचे ट्विट बघून कळते. या सामन्यासाठी भारतीयांनी इतकी तिकिटे विकत घेतली होती की दुसऱ्या देशाच्या क्रिकेट फॅन्सला तिकीटाची खूप कमी संधी मिळाली. त्यामुळेच निशमने ट्विट करून भारतीय क्रिकेट प्रेमींना आवाहन केले आहे.

आपल्या ट्विटमध्ये निशम म्हणतो, “प्रिय भारतीय क्रिकेट फॅन्स, जर तुम्ही फायनल सामना बघण्यासाठी येणार नसाल तर कृपया आपण खरेदी केलेली तिकिटे अधिकृत प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पुनर्विक्री करा. मला माहित आहे की हा मी तुम्हाला मोठा नफा मिळवण्यासाठी उद्युक्त करत आहे, पण कृपया सर्व खऱ्या क्रिकेटप्रेमींना सामना बघण्यासाठी जाण्याची संधी द्या, केवळ श्रीमंतांना नको.” आता लोक याला कसा प्रतिसाद देतात ते बघण्यासारखं आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *