वर्ल्ड कपच्या इतिहासातील आजपर्यंतचे विजेते आणि उपविजेते

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप क्रिकेटचा सर्वात मोठा मंच मानला जातो. वर्ल्ड कपमध्ये खेळायला मिळणे हे प्रत्येक क्रिकेट खेळाडूचे स्वप्न असते. नुसते क्रिकेट खेळाडूच नाही, तर क्रिकेटप्रेमींनाही वर्ल्ड कप आपल्याच देशात यावा असे वाटत असते.

एकदा संधी गेली की ४ वर्ष वाट बघायला लागते. त्यामुळे आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी जिथे सामना असेल तिथे हे क्रिकेट रसिक पोहोचत असतात. १९७५ मध्ये वर्ल्ड कपची सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत कोणते संघ विजेते आणि उपविजेते ठरलेत त्यावर नजर टाकूया…

१) १९७५ मध्ये वर्ल्ड कपची सुरुवात झाली होती, तेव्हा पहिला वर्ल्ड कप वेस्ट इंडिजने जिंकला होता. ऑस्ट्रेलियाची टीम त्यावेळी उपविजेती ठरली होती. २) १९७९ च्या वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा वेस्ट इंडिजनेच वर्ल्ड कप जिंकला आणि ज्या देशाने जगाला क्रिकेट हा खेळ दिला त्या इंग्लंडची टीम उपविजेता होती.

३) १९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजचा क्रिकेट विश्वातील दरारा संपवत कपिल देवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने फायनल मॅचमध्ये वेस्ट इंडिजला पराभूत करून वर्ल्ड कप आपल्या नावावर जमा केला होता. भारतीयांसाठी ही खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट होती.

४) १९८७ च्या वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामना क्रिकेटमधील पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये झाला. त्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभूत करून वर्ल्ड कप जिंकला होता. ५) १९९२ साली पाकिस्तानच्या संघाने इंग्लंडला पराभूत करून विश्वचषकावर स्वतःचे नाव कोरले होते. ६) १९९६ च्या वर्ल्ड कप श्रीलंकेने जिंकला, त्यांनी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते.

७) १९९९, २००३ आणि २००७ च्या वर्ल्ड कपवर ऑस्ट्रेलियाच्या संघाचे एकहाती वर्चस्व राहिले. १९९९ मध्ये त्यांनी पाकिस्तानला, २००३ मध्ये भारताला आणि २००७ मध्ये श्रीलंकेला पराभूत केले होते.

८) २०११ साली झालेल्या वर्ल्ड कपवर भारतीय संघाने आपले नाव कोरले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरला वर्ल्ड कपची भेट दिली होती. २८ वर्षांनंतर वर्ल्ड कप भारतात आला होता.

९) २०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ पाचव्यांदा विश्वविजेता ठरला, अंतिम सामन्यात त्यांनी न्यूझीलंडचा पराभव केला होता. २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड यांच्यात अंतिम सामना होईल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *