विराटच्या मते ‘या कारणामुळे’ झाला आज टीम इंडियाचा पराभव!

विश्वचषकात दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये पोहचलेल्या टीम इंडियाच्या स्वप्नांवर न्यूझीलंडने पाणी फेरले आहे. न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव करत विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताला या विश्वचषकाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत न्यूझीलंडला २३९ धावांवर रोखले होते.

भारतीय फलंदाजांनी या विश्वाचषकात दमदार कामगिरी केली होती. पण आजच्याच सामन्यात टॉप ऑर्डरच्या ४ फलंदाजांना अपयश आल्याने टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

रोहित शर्मा या विश्वचषकात जबरदस्त फॉर्ममध्ये होता पण त्याला या सामन्यात अपयश आले आणि तो अवघ्या १ धावेवर बाद झाला. विराट कोहली आणि के एल राहुल देखील अवघ्या १ धावेवर माघारी परतले. टीम इंडियाला महेंद्रसिंग धोनी आणि रवीन्द्र जडेजाने विजयाच्या जवळ नेले पण ते अपयशी ठरले.

कर्णधार कोहलीने सांगितले पराभवाचे कारण-

न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विराटने भारतीय संघाच्या कामगिरीवर सविस्तर भाष्य केले, ”२४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करू, असा आम्हाला विश्वास होता. मात्र पहिल्या ४५ मिनिटांत केलेल्या खराब खेळामुळे आम्ही सामना गमावला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे पहिल्या ४०-४५ मिनिटांच्या काळात सामना आमच्या हातातून निसटला.”

रिषभ पंत आणि पंड्या चांगले सेट झाले होते पण ते चुकीचे फटके मारून बाद झाले. त्यांच्याबद्दल विराटला विचारले असते त्याने दोघांचा बचाव केला. “पंत आणि पांड्याने चांगला खेळ केला होता. पण त्यांची फटक्यांची निवड चुकली. ते तरुण आहेत. तरुणपणी माझ्याकडूनही अशा चुका झाल्या होत्या. त्यांच्यात गुणवत्ता आहे. त्यामुळे त्यांना दोषी धरणे योग्य ठरणार नाही.” असे विराट म्हणाला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *