घरातल्या गॅसचा सिलेंडर फुटल्यास कंपनीकडुन मिळते ५० लाखांची मदत, जाणून घ्या कसे..

आपल्या देशातील बहुसंख्य लोक आता घरात LPG गॅस वापरतात. घरातला हा LPG गॅस हाताळताना काय काय काळजी घेतली जावी अशा सूचना वितरकांकडून सतत करण्यात येतात. मात्र एवढे सांगूनही दरवर्षी गॅस सिलिंडर स्फोटात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातल्या त्यात महिलांचे प्रमाण यात सर्वाधिक आहे. या कारणामुळेच ग्राहक न्यायालयाकडून अशा गॅस कंपन्यांना आपल्या ग्राहकांना विम्याच्या स्वरूपातील मदतीचे आदेश देण्यात आले आहेत.

घरातील गॅस कसा वापरायचा, तो वापरत असताना काय काळजी घ्यायची याबद्दल आपल्याला माहित आहे. मात्र घरातल्या गॅस सिलिंडर फुटल्यावर किंवा त्यातून गळती होत असल्यास ग्राहकांना कोणकोणते अधिकार असतात ते आपल्याला माहित पाहिजे. हे आहेत ग्राहकांचे अधिकार :

१) mylpg.in वरील माहितीनुसार एखाद्या ग्राहकाने LPG जोडणी घेतली असल्यास आणि त्याच्या गॅस सिलिंडरची काही घडल्यास ग्राहकाला ५० लाख रुपयांपर्यंत विमा मिळण्याचा हक्क असतो. २) एखाद्या दुर्घटनेमध्ये जास्तीत जास्त ५० लाख रुपयांपर्यंतची मदत मिळु शकते. दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंतची नुकसानभरपाई देता येते.

३) LPG गॅस सिलेंडरवरती विम्याचे संरक्षण मिळण्यासाठी ग्राहकाने दुर्घटनेनंतर त्वरित नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये आणि आपल्या LPG गॅस वितरकाला याची माहिती दिली पाहिजे. ४) ऑइल वितरक कंपन्यांमध्ये Indian Oil,HP आणि Bharat Petrolium यांना ग्राहक आणि मालमत्तेसाठी थर्ड पार्टी विमा संरक्षणासह विमा पॉलिसी घेणे गरजेचे आहे.

५) LPG गॅस जोडणी घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला या विमा पॉलिसीअंतर्गत संरक्षण देण्यात आलेले असते, मात्र यासाठी त्यांना कुठलाही वेगळा प्रीमियम भरण्याची गरज नसते. ६) गॅस सिलिंडरची दुर्घटना घडल्यास एफआयआर कॉपी, दुर्घटनाग्रस्त व्यक्तिवर दवाखान्यात उपचार सुरु असल्याची बिले, मेडिकलची बिले, व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पोस्टमोर्टम अहवाल, मृत्यूचे प्रमाणपत्र अशी कागदपत्रे जपून ठेवावीत.

७) गॅस सिलिंडरची दुर्घटना घडल्यास दुर्घटनाग्रस्त व्यक्तीकडून LPG डिस्ट्रिब्युटरच्या माध्यमातुन मदत मिळण्यासाठी दावा केला जातो, त्यानंतर इन्शुरन्स कम्पनी विम्याची भरपाई रक्कम डिस्ट्रिब्युटरकडे देतात आणि शेवटी ती रक्कम ग्राहकांना वितरित केली जाते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *