भारतात कुणाकडेही नाहीये जगातली सर्वात महागडी कर्लमन किंग!

जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या व्यक्तींमध्ये अनेक भारतीयांचा समावेश आहे. भारतीयांना महागड्या गाड्यांचे शौक देखील आहेत. पण चक्क जगातील सर्वात महागडी गाडी ओळख असलेली गाडी भारतात नाहीये म्हंटल्यावर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना. पण हे खरे आहे.

जगातली सर्वात महागडी गाडी अशी ओळख असलेल्या कर्लमन किंग (Karlmann King) एसयूव्ही गाडी भारतात कुणाकडेही नाहीये. या गाडीची किंमत तब्बल १५ कोटी रुपये इतकी आहे. जगातील महागडी समजली जाणारी हि suv भारतात कुणीही खरेदी केली नाही यावरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कर्लमान किंग हि गाडी जगभरात केवळ १२ लोकांकडे आहे. हि गाडी बनवण्यासाठी कंपनीची एक विशेष टीम काम करते. ही गाडी बनवण्यासाठी ३० हजार तास लागतात. युरोपच्या १८०० लोकांच्या टीमने ही गाडी बनवली आहे.

काय आहे गाडीची विशेषतः-

कर्लमान किंग हि गाडी दिसायला एकदम दणकट आहे. लांबीच्या बाबतीत हि गाडी ‘हमर’ गाडीला टक्कर देते. सुप्रसिद्ध हमर गाडीपेक्षा कर्लमान किंग लांब आहे.

ही गाडी तासाला १४० किलोमीटरपर्यंत धावू शकते. या गाडीचे वैशिष्ट्ये म्हणजे ही गाडी ४० डिग्री ते २०० डिग्री तापमानापर्यंत सहज सामना करू शकते. ६.८ लीटरचे व्ही१० इंजिन असून ते ४०० बीएचपीचे पॉवर देते.

सुविधांच्या बाबतीतहि गाडी मागे नाहीये. गाडीमध्ये अनेक लक्सरीअस सुविधा आहेत. यामध्ये सॅटेलाइट टीव्ही, फ्रिज, सॅटेलाइट फोन, कॉफी मशीन आणि जेवण करण्यासाठी टेबल आहे. या सर्व सुविधा मोबाईलवरून देखील ऑपरेट केल्या जाऊ शकतात.

भारतात लवकरच हि गाडी बघायला मिळेल अशी अशा करूया. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *