या दोन गोष्टी झाल्यास पाकिस्तान पोहचू शकतो सेमीफायनलमध्ये!

यंदाच्या विश्वचषकात शेवटपर्यंत सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी स्पर्धा बघायला मिळाली. लीगच्या अवघ्या काही मॅच शिल्लक राहिल्या असताना देखील सेमीफायनलचे ४ संघ पक्के झाले नव्हते. ऑस्ट्रेलियाने सर्वात अगोदर सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भारताने देखील आपले स्थान पक्के केले. काल न्यूझीलंडचा पराभव करून इंग्लंडनेही आपले स्थान पक्के केले.

सेमीफायनलच्या चार टीम कालच्या सामन्यानंतर जवळपास निश्चित झाल्याच आहेत. पण अधिकृतरीत्या अजूनही न्यूझीलंडचा सेमीफायनलमध्ये प्रवेश झालेला नाहीये. बांगलादेश आणि पाकिस्तान सामन्यानंतर त्यांचा सेमीफायनलचा प्रवेश पक्का होणार आहे. बांगलादेशने पाकिस्तानला हरवल्यास पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर होणार आहे.

पाकिस्तानला सेमीफायनलचे तिकीट मिळवणे सोपे नाहीये. पाकिस्तानने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पराभवाचे तोंड बघितल्यानंतर विश्वचषकात पुनरागमन केले होते. पण त्यांच्या सेमीफायनलच्या आशा धूसरच आहेत. पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये दोन पैकी एक गोष्ट झाली तरच प्रवेश मिळू शकतो.

पाकिस्तानचे सध्या ११ पॉईंट असून न्यूझीलंडचे देखील ११ पॉईंट आहेत. पाकिस्तानने बांगलादेशला हरवल्यास दोघांचे ११ पॉईंट होतील आणि नेट रन रेट नुसार चौथा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल.

पाकिस्तान या दोन गोष्टींपैकी एक गोष्ट झाल्यास करू शकतो सेमीफायनलमध्ये प्रवेश-

१. बांगलादेशला पाकिस्तानने कमीत कमी ३१६ धावांनी हरवावे-

नेटरनरेटने पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. न्यूझीलंडचे नेट रनरेट +०.१७५ आहे तर पाकिस्तानचे नेट रनरेट -०.७९२ आहे. पाकिस्तानला यासाठी बांगलादेशला ३१६ धावांनी पराजित करावे लागेल. बांगलादेशने देखील या विश्वचषकात खूप चांगला खेळ खेळला आहे. त्यामुळे पाकिस्तान एवढ्या धावांनी विजयी होईल अशी शक्यता खूप कमी वाटते.

पाकिस्तनाने अगोदर गोलंदाजी केली तर पाकिस्तानला प्रवेश करण्याची संधी संपल्यात जमा होते. पाकिस्तानला अगोदर फलंदाजी करून नंतर बांगलादेशला ३१६ धावांनी पराजित करणे गरजेचे आहे.

२. एखाद्या टीमने सेमीफायनलमध्ये खेळण्यास नकार दिल्यास-

सध्या ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंडने सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करून आपले स्थान पक्के केले. सेमीफायनलमध्ये चौथी टीम न्यूझीलंड असणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे पाकिस्तानचे आव्हान संपुष्ठात येणार आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला सेमीफायलमध्ये प्रवेश तेव्हाच मिळू शकतो जेव्हा एखाद्या टीमने सेमीफायनलमध्ये खेळण्यास नकार दिला तर.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *