पोलिसांच्या १९ गोळ्या खाऊन जिवंत राहिलेला मुंबईचा डॉन डिके राव..

मुंबई मधील एक असा डॉन आहे ज्याने पोलिसांच्या १९ गोळ्या खाऊन जिवंत राहिलेला. असा मृत्यूला चकवा देणारा व्यक्ती म्हणजे मुंबईचा डॉन डिके राव आज आपण खासरे वर जाणून घेऊया डिके राव बद्दल.

डिके राव हे नाव मुंबई च्या गुन्हेगारी क्षेत्रात प्रसिद्ध आहे. पण त्या व्यक्तीचे हे खरे नाव नाही आहे. त्याचे खरे नाव रवी मल्लेश बोरा असे असून त्याने एक बँक ची कॅश व्हॅन लुटली तेव्हा त्याने एक आय कार्ड हि चोरले जे आय कार्ड चोरले होते ते डिके राव या व्यक्तीचे होते. रवी मल्लेश बोरा ने त्याच व्यक्तीच्या नावाचा वापर करून गुन्हे घडवले आणि तो मुंबई च्या गुन्हेगारी क्षेत्रांत डिके राव नावाने प्रसिद्ध झाला.

डिके राव चे वडील कर्नाटक येथून मुंबई येथे आपला उदरनिर्वाह करायला आले होते. एक सामान्य कुटुंबातून डिके राव वाढला पण तो तरुण वयातच गुन्हेगारी कडे वळला वडाळा माटुंगा परिसरात तो मुले घेऊन दहशत निर्माण करायचा. याच दरम्यान त्याचे भांडण खालसा कॉलेज परिसरात झाले. त्याठिकाणी त्याच्यावर पहिला एफआयआर नोंदण्यात आला. याच्या काही दिवसांनी त्याने बँक ला कॅश घेऊन जाणारी गाडी लुटुली यातून त्याला २५ लाख रुपये मिळाले. १९९० मध्ये २५ लाख म्हणजे खूप मोठी रक्कम होती.

येथून डिके राव ने त्या वर्षी अनेक कॅश व्हॅन लुटल्या कोणतीही कॅश व्हॅन असो ती तो लुटत असे. त्याच्या कृतीची तेव्हा चर्चा झाली आणि पोलिसांनी लक्ष घालून त्याला पकडले. तो तुरुंगात गेल्यानंतर त्याचे संबंध छोटा राजन सोबत आले.

तेथून तो छोटा राजन याचा खास माणूस झाला. आणि छोटा राजन ने दिलेल्या जबाबदाऱ्या तो पूर्ण करायचा.याच दरम्यान मृदुला लाड या इंस्पक्टर ला डिके राव ची टीप मिळाली आणि तिने डिके राव ला घेरून अटक केले. येथे त्यांना समजले कि रवी मल्लेश आणि डिके राव हे दोन वेगळे लोक नाहीत तर एकच आहेत.

तुरुंगातून सुटल्यानंतर डिके हा छोटा राजनचे काम पुन्हा सुरु केले. मुंबई मध्ये जो बॉम्ब ब्लास्ट झाला होता त्यात दाऊद चा हात होता आणि त्याच्या काही माणसांनी त्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये प्रत्येक्ष सहभाग हि घेतला होता. बॉम्बस्फोटात बाबा मुसा याचा हि सहभाग होता. त्याला संपण्यासाठी ११ नोव्हेंबर १९९८ रोजी डिके राव ने प्लॅन बनवला आणि बाबा मुसाच्या मागावर निघाला. पण याची टीप मुंबई पोलिसांना मिळाली कि दाऊद च्या खास बाबा मुसा याला डिके राव मारणार आहे.

मुंबई पोलिसांनी डिके राव च्या गाडीचा पाठलाग करून त्याला ओव्हरटेक केले व गोळ्यांची बरसात केली. सर्व गुन्हेगार मारल्यानंतर डेड बॉडीज पोलीस व्हॅन मध्ये घेऊन हॉस्पिटल कडे निघाले. मध्येच गाडी मधून आवाज आला तेव्हा पुन्हा पोलिसांनी गाडीतील डेड बॉडीज वर गोळ्या घातल्या. पोलिसांना डिके राव ला कोणत्याही हालती मध्ये जिवंत ठेवायचे नव्हते हे दिसून येते.

गाडी हॉस्पिटल मध्ये पोहचली आणि डॉक्टर डेड बॉडीज पाहत होते तेव्हा डिके राव डेड बॉडीज खालून ओरडला डॉक्टर साहेब मी जिवंत आहे मला वाचावा. १९ गोळ्या लागलेला राव जिवंत पाहून डॉक्टर आणि पोलीस हि आश्चर्यचकित झाले. त्यानंतर १० वर्ष त्याने तुरुंगातूनच छोटा राजन याचे काम पाहिले. छोटा राजन गॅंग मधील ओपी सिंग म्हणून गुन्हेगार जेल मध्ये होता छोटा राजन याला समजले कि हा आपल्याला दगा देऊन स्वतःची टोळी सुरु करतोय तर डिके ला सांगितले. डिके ने त्याला नाशिक जेल मध्येच गळा दाबून मारून टाकले.

डिके राव याने दाऊद चा भाऊ इकबाल कासकर वर हल्ला केला होता त्यात कासकर चा ड्राइवर मृत्यूमुखी पडला. त्याबाबत डिके अजून हि तुरुंगात आहे. काहीच वर्षांपूर्वी जेल मधून कोर्टात आणताना दाऊद ने डिके ला मारायचा प्लॅन बनवला होता पण पोलिसांना टीप मिळाली व डिके चे प्राण वाचले. आज डिके व छोटा राजन तुरुंगात आहेत. असे बोलले जाते कि डिके आजही तुरुंगातून छोटा राजन चे कामकाज पाहतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *