बॉलीवूडवर २७ वर्ष अधिराज्य गाजवणाऱ्या बादशाहच्या संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क !

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो. चाहत्यांकडून किंग खान अशी उपाधी मिळवलेला शाहरुख बॉलीवूडचा खराखुरा किंग आहे. २५ जून १९९२ रोजी प्रदर्शित दीवाना या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या शाहरुखने आजपर्यंत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. शाहरुखने सुरुवातीच्या काळात बाजीगर, डर या चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या. पुढे त्याने नायक म्हणून अनेक हिट सिनेमे करत आपली प्रतिमा बदलली.

शाहरुखला आज कुणी बादशाह म्हणून तर कोणी किंग खान तर कुणी रोमान्सचा किंग म्हणून ओळखते. आपल्या अभिनयाच्या बळावर शाहरुखने चाहत्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान बनवलं आहे. करिअरच्या २७ वर्षांत शाहरुखने ‘डर’, ‘बाजीगर’, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘देवदास’, ‘चक दे इंडिया’ अशा विविध चित्रपटात एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत.

बॉलीवूडचा किंग शाहरुख संपत्तीच्या बाबतीतही आहे बॉलीवूडचा किंग-

शाहरुख आलिशान लाईफ जगतो. शाहरुखच्या वांद्रे येथे असलेल्या आलिशान मन्नत बंगल्याची किंमत जवळपास २०० कोटींच्या घरात आहे. दुबईमध्ये शाहरुखचा ‘व्हिला के ९३’ हा बंगला आहे तर लंडनमधील पार्क लेन इथंसुद्धा त्याचं घर आहे. शाहरुखच्या या संपत्तीची किंमत १६७ कोटी आहे. शाहरुखकडे अनेक आलिशान गाड्या आहेत.

शाहरुखच्या संपत्तीबाबत एका इंग्रजी वेबसाईटने माहिती जाहीर केली आहे. या वेबसाइटवरून शाहरुखची एकूण संपत्ती सुमारे ४१ अब्ज ६३ कोटी रुपयांच्या घरात आहे.

शाहरुखकडे ‘ऑडी A6’, ‘बीएमडब्ल्यू i8’, ‘बीएमडब्ल्यू 7 सीरिज’, ‘हार्ले डेव्हिडसन डायना स्ट्रीट बॉब’ ‘बेंटली कॉन्टिनेंटल जीटी’ या महागड्या कार आहेत. याशिवाय शाहरुख आयपीएलच्या केकेआर संघाचा सहमालक देखील आहे. त्याच्याकडे संघाच्या मालकीचे ५५ टक्के शेअर असून त्याची किंमत जवळपास ५७५ कोटी इतकी आहे. तसेच शाहरुखच्या रेड चिलीज या कंपनीची देखील वार्षिक उलाढाल ५०० कोटींच्या घरात आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *