भारत पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित हा व्हिडीओ पाहिला नसेल तर मग काय पाहिले ?

२०१७ च्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच आठवते का ? एकदा नाही, दोनदा झाली होती. मॅच तशी मैदानावर झाली होती पण मैदानाबाहेर फक्त कल्लोळ झाला होता. इंग्लंड पासून भारत आणि पाकिस्तानच्या रस्त्यांवर, घरांमध्ये, चौकामध्ये, सर्वत्र !

भारतात काही लोक पाकिस्तानच्या विजयाचा आनंद घेताना आढळले तर त्यांच्यवर देशद्रोहाचा गुन्हा घालण्यात आला, जो नंतर हटवण्यात आला. एका पाकिस्तानी ट्विटर युजरने कॅप्टन सरफराजची तुलना शाहरुखसोबत केली तर पाकिस्तानच्या लोकांनी त्याची तक्रार केली. फायनलनंतर बर्मिंगहममध्ये मैदानाबाहेर भारत आणि पाकिस्तानच्या समर्थकांमध्ये मारामारी झाली होती.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर सगळे कुंबळे आणि कोहलीच्या वादामध्ये व्यस्त झाले. मात्र खरी कहाणी तर त्या व्हिडिओमध्ये आहे, जो २० जून २०१७ ला शेअर केला होता. एकीकडे सगळे भारत आणि पाकिस्तान समर्थक एकमेकांशी वाद घालण्यात गढले होते, तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडमध्ये राहणारे हे भारतीय आणि पाकिस्तानी नागरिक एकाच वेळी आनंद साजरा करत होते.

हा व्हिडीओ इंग्लंडच्या मेट्रो ट्रेनमधील आहे, ज्यात भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचे टीशर्ट घातलेले लोक एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसत आहे. दोन्ही देशांच्या जर्सी घातलेले लोक हिंदुस्थान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत आहेत. ते हि मिळून आणि न भांडता !

फेसबुकवर हा व्हिडीओ “इंगंडमध्ये भारत आणि पाकिस्तानचे समर्थक. हा व्हिडीओ प्रत्येक भारतीय आणि पाकिस्तानी व्यक्तीला दाखवा” असे कॅप्शन टाकून शेअर केला गेला. तुम्हीही बघा हा व्हिडीओ –

जरी या व्हिडिओत भारत आणि पाकिस्तानचे समर्थक एकत्रित विजयाचा आनंद साजरा करताना दिसत असले, तरी यावेळेस जेव्हा भारताने पाकिस्तानला हरवले तेव्हा पाकिस्तानचे समर्थक नाराज झाले. इतके नाराज झाले की आपल्या पाकिस्तानी टीमचा कॅप्टन सरफराज बद्दल वाईटसाईट बोलू लागले.

टीव्ही फोडायला लागले. इथपर्यंत बोलले की आपल्याला भारतापासून वेगळे व्हायला नको होते, कारण आपण पाकिस्तानच्या बाजूने जिंकू शकत नाही. म्हणतात ना खेळाला खेळासारखं खेळा, पाकिस्तानी समर्थकांनाही खेळभावनेचा सन्मान करता आला पाहिजे. खेळात हार किंवा जीत होतच असते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *