अभिनेते जितेंद्र यांच्या या पैजेमुळे त्यांची ४४ वर्षांची मुलगी एकता कपूर आहे अजूनही सिंगल

बॉलिवूड निर्माती आणि टीव्ही इंडस्ट्रीची राणी म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर ४४ वर्षांची झाली आहे. बहुतेक एकता ही पहिलीच अशी सिनेतारकाची मुलगी असेल, जिने आपलं करिअर अभिनयाऐवजी दिग्दर्शनामध्ये आजमावलं. एकताने वयाच्या १९ व्या वर्षीच काम करायला सुरुवात केली आणि मागच्या अनेक वर्षांपासून मनोरंजन जगतात ती आपले योगदान देत आहे. एकता कपूर ही बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांची मुलगी आणि तुषार कपूरची बहीण आहे.

एकता कपूर खरोखरच डेली सोपची राणी आहे. तिने आतापर्यंत एक से बढकर एक सिरीयल बनवल्या आहेत. कसोटी जिंदगी की, क्योंकी सांस भी कभी बहु थी, कहानी घर घर की आणि नागीन सारख्या अनेक लोकप्रिय सिरियल्समुळे तिला प्रसिद्धी मिळाली आहे. एकताने केवळ टीव्हीच नाही, तर दर्जेदार वेब सीरिजच्या माध्यमातून फॅन्सचे मनोरंजन केले आहे. मात्र वयाची ४४ वर्ष झाली तरी एकताचे अजून लग्न झाले नाही, एवढी एकच गोष्ट तिच्या आयुष्यात कमी आहे.

का आहे एकता अजून सिंगल ?
एकताच्या खाजगी आयुष्याविषयी बोलायचं झालं तर सरोगसीच्या माध्यमातून एकता आई तर झाली आहे, मात्र अद्याप ती सिंगल आहे. एकताने एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला आणि त्यात सांगितले की तिने आतापर्यंत लग्न केले नाही कारण ती सलमान खानच्या पावलांवर चालत आहे. तथापि एक वेळ अशी होती, वयाच्या २२ व्या वर्षी एकता लग्नाचा विचार करत होती. जेव्हा एकता १७ वर्षांची होती तेव्हा तिचे वडील अभिनेते जितेंद्र यांनी सांगितले होते की, तिने लग्न करावे किंवा पार्टी करण्याऐवजी काम करावे जसे की त्यांची इच्छा होती.

एकताचे वडील तिला खूप कमी पॉकेट मनी देत असायचे, त्याव्यतिरिक्त काहीही द्यायला त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे एकताने एका जाहिरात एजन्सीत काम करायला सुरुवात केली. त्यानंतर तिने प्रोडक्शनमध्ये प्रयत्न केला आणि ती एकामागून यशाच्या पायऱ्या चढत गेली. एकताने लग्न करण्याऐवजी काम करण्याचा निर्णय घेतला.

घटस्फोट हे सुद्धा लग्न न करण्याचे कारण
एकताने मुलाखतीत सांगितले की, तिच्या ज्या मैत्रिणींचे लग्न झाले होते त्या आज सिंगल आहेत. तिने मागच्या काही वर्षांत अनेक घटस्फोट बघितले आहेत. एकताला वाटतं तिच्यात संयम आहे, त्यामुळेच मी इतके दिवस सिंगल राहू शकले. याव्यतिरिक्त एकता सरोगसीद्वारे एका मुलाची आई बनली आहे. मुलाचे नाव तिने रवी ठेवले आहे. एकता सिंगल पॅरेंट म्हणूनच खुश आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *