सोनाक्षी सिन्हा आगामी चित्रपटात मर्दांच्या गुप्त रोगांवर इलाज करताना दिसणार! बघा ट्रेलर..

सोनाक्षी सिन्हाचे दिवस काय सध्या ठीक चालले नाहीत. तिचा “इत्तेफाक” चित्रपट सोडला तर तिचे १० सिनेमे सलग आपटले आहेत. पण ती हार मानून घरी बसली नाही. काम करत आहे. आता तिचा पुढचा चित्रपट येत आहे, ज्याच्या सोनाक्षी आणि सिनेरसिकांना बऱ्याच अपेक्षा आहेत.

या चित्रपटाचे नाव आहे “खानदानी शफाखाना !” मागच्या दोन तीन दिवसांपासून या चित्रपटाची बरीच चर्चा सुरु आहे. २१ जूनला या चिंत्यरुपातच ट्रेलर आला आहे, जो बराच मनोरंजक आहे. काय आहे चित्रपटत या ते पाहुया…

खानदानी सेक्स दवाखाना

हा चित्रपट एका खानदानी सेक्स क्लिनिकबद्दल आहे. मामाजीने मरण्यापूर्वी हा दवाखाना बबिता म्हणजेच सोनाक्षी सिन्हाच्या नावावर केला आहे. हा दवाखाना विकला तर करोडो रुपये मिळतील. परंतु विकायला ६ महिन्यांचा वेळ आहे. तोपर्यंत हा दवाखाना चालवण्याची जबाबदारी बेबी म्हणजेच बबिताला दिली जाते.

बेबी क्लीनिक तर सुरु करते, पण मर्द तिला समस्या सांगायला कचरतात. सोबतच ते आपल्या गुप्त रोगांविषयी विचित्र सांकेतिक भाषेत माहिती देतात. यामुळे बेबीला समजायला अडचण येते. त्यामुळे ती सेक्स आणि गुप्ता रोगांविषयी खुलेपणाने बोलण्याची मोहीम सुरु करते. यामध्ये ती एका प्रसिद्ध पंजाबी गायकाची मदत घेते. पण नंतर समजते की, तो गायक स्वतःच सेक्सच्या समस्येने ग्रासला आहे.

वेगळा पण महत्वाच्या विषयावर टाकणारा चित्रपट

या चित्रपटाची कथा खूप वेगळी आणि प्रासंगिक विषयांवर प्रकाश टाकणारी आहे. कॉमेडीचा तडका मारून एका गंभीर विषयाला हलक्याफुलक्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न याद्वारे केला आहे. लोकांना कॉमेडीच्या माध्यमातून सांगितलेलं लगेच समजतं. आयुष्यमान खुराणा अशाच जॉनरचे चित्रपट करून सुपरस्टार बनला आहे. पण आजपर्यंत कुठल्या हिरॉइनने प्रमुख भूमिका असणारा असा चित्रपट केला नाही.

हा चित्रपट शिल्पा दासगुप्ता त्यांनी दिग्दर्शित केला आहे. सोनाक्षी सिन्हा यात बॅबिटचा रोल निभावत आहे. २६ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच दिवशी कंगना राणावतचा “मेंटल है क्या” आणि क्रिती सेननचा “अर्जुन पटियाला” हा चित्रपट लाँच होत आहे.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *