आताची सर्वात मोठी बातमी; तैमूरने केली चिखलात शी! वाचा भन्नाट विनोदी रिपोर्टींग..

सगळ्यात मोठी बातमी

आत्ता हाती आलेली सगळ्यात मोठी बातमी म्हणजे स्टारकीड तैमुर चिखलात खेळतोय. मान्सूनने मुंबईत हजेरी लावली असून तैमुरने चिखलात शी करुन मान्सूनचे स्वागत केले आहे.

आमचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले आहेत. काय सांगशील राजेश, काय परिस्थिती आहे आत्ता तिथली ?

ध्यानदा मी आत्ता तैमुरच्या बंगल्यासमोर उभा आहे आणि आपण पाहू शकतो तैमूर त्यांच्या बंगल्यासमोरील गवतात शी करतो आहे. हे एक्सक्ल्युजिव्ह दृश्य फक्त आपल्या चॅनेलवर दिसत आहे ध्यानदा.

नक्कीच राजेश, आपण आमच्या चॅनेलवर तैमुरची शी लाईव पाहु शकता. राजेश आतापर्यंत झालेल्या घडामोडी सांगू शकशील का ? तैमुर शांत आहे का ?

नक्कीच ध्यानदा तैमुरने आत्तापर्यंत दोन वेळा जागा बदलली आहे. आधी तो गवतात बसला होता मात्र तिथुन उठून तो आता चिखलात बसला आहे. याबाबत वनस्पती संशोधकांकडे विचारणा केली असता गवतामुळे तैमुरच्या ढुंगीला गुदगुल्या झाल्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज त्यांनी वर्तवला आहे. आता तैमुर चिखलात बसला असून काडीने चिखलात रेघोटया ओढतो आहे ध्यानदा.

खरच राजेश तैमुरच्या अंगात कलाकाराचे रक्त असल्यामुळे त्याची कला चिखलात उमटत असल्याचे याठिकानी तुम्ही पाहू शकता. राजेश किती वेळ झाला तैमुर शी करतोय आणि यानंतर त्याचे पुढचे नियोजन काय असेल ?

नक्कीच ध्यानदा तैमुर बरोबर 13 मिनिट 39 सेकंदापासून बसला आहे. आत्ता पर्यन्त त्याने 3 वेळा जागा बदलली असून आता त्याची शी धुण्याचा सुवर्णयोग आला आहे. ध्यानदा आपण पाहू शकतो तैमुरने ऊभं राहून पाण्याचा पाईप घेतला आहे. आता तो काय करणार ? तो थेट पायपाने ढुंगण धुणार की हाताने धुणार ? की आया त्याला मदत करणार ? आपण पाहू शकतो ध्यानदा तैमुरच्या डाव्या हातात पाइप आहे, म्हणजे तो उजव्या हाताने ढुंगण धुण्याची शक्यता आहे.

नक्कीच राजेश. आपण पाहू शकता तैमूरने स्वतःच्या हाताने ढूंगण धुण्याचे हे एक्सक्लूझिव विजुअल फक्त आपल्या चॅनेलवर. राजेश हा दुग्धशर्करा योग ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी कोण कोण आलं आहे ?

नक्कीच ध्यानदा तैमुर आज पाहिल्या पावसात बसुन शी करत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने सर्व वृत्तवहिन्याचे प्रतिनिधी ओबी वँनसह दाखल झाले आहेत. सर्वजण लाखो रूपयाचे कॅमेरे घेऊन इथे दाखल झाले आहेत. पण आपला चॅनेल अकरा वर्षापासून नंबर एक असल्याने तैमुरची शी फक्त आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त झाली आहे.

राजेश तू तैमुरच्या शी वर लक्ष ठेवून रहा. धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.

तर तैमूर स्वतःच्या हाताने शी धूणार का ?
एवढ्या लहान वयात तो हे आव्हान पेलणार का ?
किती लीटर पाणी यासाठी वापरणार ?

पाणी गरम असेल की थंड ? या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर आमचा “माझी शी” हा विशेष कार्यक्रम नक्की पहा आज दुपारी तीन वाजता.
तोपर्यंत पाहत रहा….
-नितीन थोरात

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *