तिकडे मैदानावर भारताने मॅच जिंकली आणि इकडे प्रेक्षकांमध्ये तरुणाने मुलीचे हृदय

क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यात केवळ मैदानातच रोमांचक किस्से घडत नाहीत, तर मॅच पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्येही अनेक रोमांचक किस्से घडत असतात. मैदानावरील खेळाडूच नाही, तर प्रेक्षकांमधील काही अवलिया लोकही आपले मनोरंजन करत असतात. असाच एक किस्सा भारत आणि पाकिस्तान यांच्यात “फादर्स डे” दिवशी झालेल्या सामन्यादरम्यान घडला.

एका बाजूला मैदानावर भारत जिंकला, तर दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका तरुणाने मुलीला प्रपोज करून तिचे हृदय जिंकले. म्हणजेच मैदानावर रोमांच होता तर प्रेक्षकांमध्ये रोमान्स ! या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पाहूया काय आहे प्रकरण…

रविवार, १६ जूनचा तो सुंदर क्षण

एकंदर विषय असा आहे की रविवार १६ जून २०१९ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरु होता. प्रेक्षकांच्या स्टॅन्डमध्ये भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी हजारो समर्थक आले होते. याच प्रेक्षकांमध्ये एक जोडपंही मॅच बघायला आलं होतं. सुरुवातीला भारताची बॅटिंग झाली होती. पाकिस्तानची टीम खेळायला उतरली तेव्हा त्यांच्या एकामागून एक विकेट्स पडायला लागल्या.

मैदानात विकेट पडत असताना इकडे प्रेक्षकांमध्ये बसलेल्या त्या तरुणाने आपल्यासोबत आलेल्या मुलीला लग्नासाठी प्रपोज केलं. झालं, मैदानाबाहेरही एक विकेट पडली ! असे काही याठिकाणी आपल्याला प्रपोज केलं जाईल याचा मुलीला अंदाज नव्हता.

गडी गुडघ्यावर बसून अंगठी पुढे करत म्हणाला…

Anvita (@BebuJ) हे ट्विटर अकाउंट वापरणाऱ्या त्या मुलीने स्वतः हा व्हिडीओ शेअर केला आहे. ती लिहते, “…तर असं घडलं.” निश्चितच अन्विताच्या आयुष्यातील हा सर्वात सुखद आणि आश्चर्याचा क्षण होता. हजारोंच्या गर्दीत, मैदानामध्ये तिच्या बॉयफ्रेंडने गुडघ्यांवर बसून अंगठी काढत तिला विचारले, “तू माझ्याशी लग्न करशील का ?” हे ऐकताच अन्विताच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यानंतर अन्विताने बॉयफ्रेंड कडून अंगठी घालून घेऊन त्याच्या प्रपोजला होकार दिला.

१ लाखांहून अधिक लोकांनी बघितला तिचा व्हिडीओ

अन्विताने या प्रसंगाचा २८ सेकंदाचा एक व्हिडीओ २१ जून रोजी ट्विटरवर शेअर केला. ट्विटरवर पोस्ट केल्यापासून आतापर्यंत १११००० हुन अधिक लोकांनी बघितला आहे. व्हिडिओमधील गर्दीच्या कल्लोळात एवढंच समजतंय की अन्विताच्या बॉयफ्रेंडचे नाव निखिल आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *