हस्तमैथुन करणाऱ्यांना ‘या गोष्टी’ माहीती असल्याच पाहिजे!

हस्तमैथुन हा स्वतःला आनंद मिळवण्याचा एक नैसर्गिक प्रकार आहे. हस्तमैथुन बद्दल लोकांमध्ये अनेकप्रकारचे गैरसमज आहेत. अनेकांच्या मते ते चुकीचं असून अनेकजण त्याला योग्य देखील समजतात. विज्ञानाच्या मते देखील हस्तमैथुन चुकीचं नाहीये. हस्तमैथुनचे आरोग्यास फायदे असून हि एक सामान्य गोष्ट आहे. फक्त हस्तमैथुन करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

हस्तमैथुनबाबत बरेचसे गैरसमज आहेत. हस्तमैथुन म्हणजे स्वतःच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करून स्वतःला आनंद देणे होय. प्रत्येक व्यक्ती हे वेगवेगळ्या प्रकारे करतात. हस्तमैथुन करताना व्यक्ती त्याच्या डोक्यातील सुंदर क्षणांची कल्पना करतो. हस्तमैथुन द्वारे वीर्यला मोकळी वाट करून दिली जाते.

हस्तमैथुन बद्दल अनेक गैसमज असले तरी हे चुकीचे अजिबात नाही. हा स्वत:ला आनंद मिळवून देण्याचा एक सामान्य प्रकार आहे. याने तुम्ही स्वत:ला लैंगिक सुख मिळवून देत असता. याला फार खाजगी मानलं जातं. सार्वजनिक ठिकाणांवर असं काही करू नये कारण असं करणं कायदेशीररित्या गुन्हा आहे. हस्तमैथुन मुलं आणि मुली दोघेही करतात. मुलांमध्ये १७ वयानंतर हस्तमैथुनाची इच्छा वाढू लागते. पण काही मुलांना असं काही करावं वाटत नाही. हस्तमैथुनाची इच्छा होईल तेव्हा त्यांनी असं काही करावं.

आरोग्यासाठी हस्तमैथुन हानिकारक आहे का?

आरोग्यासाठी हस्तमैथुन हानिकारक नाही. हस्तमैथुनामुळे तुम्ही अंध किंवा वेडे होत नाहीत. तसेच हस्तमैथुन केल्याने डोळ्याखाली डार्क सर्कलही होत नाहीत. तसेच शारीरिक विकासही रोखला जात नाही. वास्तविकता ही आहे की, हस्तमैथुन केल्याने तुमचा तणाव कमी होतो आणि शरीराला आनंद देणारे इन्डॉर्फिन हार्मोस रिलीज होतात. याने तुम्हाला रिलॅक्स वाटतं.

मुलीनी हस्तमैथुन काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. मुलींनी हस्तमैथुन करताना करताना गुप्तांगामध्ये काही सेक्स टॉयचा वापर करताना स्वतःला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. या सेक्स टॉयच्या माध्यमातून बॅक्टेरिया आत जाऊ शकतो. त्यामुळे याची देखील काळजी घ्यायला हवी. काळजी नाही घेतल्यास तुम्हाला वेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

तज्ज्ञांच्या मते तारुण्यात वेळोवेळी कामवासनेला वाट मोकळी करून देण्याचा हस्तमैथुनाचा मार्ग चुकीचा नाहीये. दाटलेल्या लैंगिक उत्तेजनेला मोकळी वाट करून देण्यास जर आपण मज्जाव केला तर तेसुद्धा अनेक प्रकारे शारीरिक व मानसिकदृष्टय़ा घातक ठरू शकतं.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *