आमिर खानने मुंबईतील घराजवळ खरेदी केली प्रॉपर्टी, किंमत किती आहे माहित आहे का ?

आमिर खानचं सध्या काय चाललंय हे विचाराल तर तो सध्या “लाल सिंह चढ्ढा” सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. हॉलिवूडमधील अभिनेता टॉम हॅन्क्सच्या फॉरेस्ट गंप या चित्रपटाचा तो रिमेक असणार आहे. या चित्रपटात आमिर सोबत करीन कपूर काम करणार आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आमिरने या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटातील पात्रासाठी आमिर खान परत एकदा आपले वजन कमी करत आहे.

माहिती अशी आहे की आमिर तरुण दिसावा म्हणून त्याला हे वजन कमी करावे लागत आहे. पण सध्या आमिर सध्या चर्चेत आहे तो त्याच्या घराजवळ त्याने विकत घेतलेल्या प्रॉपर्टीबद्दल…

आमिर खान गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या ऑफिससाठी एखाद्या चांगल्या जागेच्या शोधात होता. शेवटी त्याला पसंत पडणारी जागा आपल्या घराजवळच सापडली. माहितीनुसार आमिरने ऑफिस जागेव्यतिरिक्त ६ बेसमेंट असणाऱ्या कार पार्किंगसाठी देखील गुंतवणूक केली आहे. प्रॉपर्टी डॉक्युमेंटसचा विचार करता हे युनिट्स Shipping Firm Anglo Eastern Tanker Management (HongKong) Ltd. यांचे होते.

आमिर खानने विकत घेतलेल्या प्रापर्टीची किंमत किती आहे ?

आमिरने त्याच्या घराजवळ ऑफिस बनवण्यासाठी विकत घेतलेल्या प्रॉपर्टीची किंमत जवळपास ३५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. त्याने सांताक्रुजच्या पश्चिम भागातील एसपी रोडवर ९००० स्क्वेअर फूट युनिट्स खरेदी केले आहेत. DNA च्या बातमीनुसार आमिरने प्रति स्क्वेअर फूट ३७८५४ रुपये किंमत मोजली आहे.

प्राईम प्लाझा नावाच्या बिल्डिंगमध्ये घेण्यात आलेल्या चार ऑफिसच्या युनिट्सपैकी तीन युनिट्स दुसऱ्या मजल्यावर तर चौथे युनिट तिसऱ्या मजल्यावर आहे. या सगळ्या व्यवहारासाठी त्याने २.१ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी अदा केली आहे. या व्यवहाराच्या कागदपत्रांवर आमिरची आई झीनत ताहीर हुसेन यांच्या सह्या आहेत. आमिर खान प्रोडक्शन हाऊस या नावाने या व्यवहाराची नोंदणी करण्यात आली आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *