शिखर धवन वर्ल्ड कप मधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा काय बोलला ?

शिखर धवन उर्फ भारतीय टीममधील गब्बर ! आयसीसीच्या कुठल्याही स्पर्धेत छाप सोडणारा खेळाडू. वर्ल्ड कपच्या दुसऱ्याच मॅचमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या मजबूत संघाविरुद्ध त्याने शतक झळकावले. मात्र तिथूनच एक वाईट बातमी आली की, शिखरच्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे.

या दुखापतीवर मात करून लवकरच शिखर संघात पुनरागमन करेल अशी आशा होती. मात्र आता ती आशा मावळली आहे. दुखापतीमुळे शिखर वर्ल्ड कपमधून बाहेर गेला आहे. त्याच्या जागी रिषभ पंतला संघात स्थान मिळाले आहे. संघासाठी हा एक मोठा झटका आहे. पण खुद्द शिखर धवन याबद्दल काय विचार करतो. शिखरने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

काय म्हणतोय शिखर धवन ?

वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या फॅन्सना शिखर सांगतो की, “तुम्ही लोकांनी माझ्यासाठी जी प्रार्थना केली, जे समर्थन दिले, त्यासाठी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. पण माझा दुखापतग्रस्त अंगठा वेळेवर ठीक होणार असे दिसत नाही. माझी खरोखरच वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची इच्छा होती आणि आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करू इच्छित होतो.

आता माझ्यासाठी हेच ठीक राहील की, मी परत जावं आणि लवकरात लवकर ठीक होण्याचा प्रयत्न करावा, पुढच्या स्पर्धेसाठी तयार व्हावं ! मला वाट आहे की संघात सर्वजण चांगले खेळत आहेत आणि आपण नक्की वर्ल्ड काप जिंकणार. तुम्ही असेच आमच्यासाठी प्रार्थना करत रहा. सपोर्ट करत रहा. तुमचा हा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो. सर्वांचे आभार !

शिखर धवनच्या जागी विजय शंकरला संघात स्थान

शिखर धवनच्या दुखापतीमुळे त्याच्या जागी संघात जागा घेण्यासाठी अनेकजणांची नावे चर्चेत होती. त्यातल्या त्यात रिषभ पंतचे नाव सर्वात आघाडीवर होते. रिषभ पंतने इंग्लंड मधील आपला फोटो शेअर केल्याने त्यालाच संघात घेण्यासाठी इंग्लंडला बोलावले आहे काय अशा चर्चाही होत्या.

अपेक्षेप्रमाणे रिषभ पंतला स्थान देण्यात आले आहे. पण पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विजय शंकरला संधी मिळाली आणि वर्ल्ड कपच्या पहिल्याच बॉलला विकेट घेणारा विजय शंकर हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने २२ धावांत २ बळी घेऊन आपली निवड सार्थ ठरवली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *