भारतातल्या नोटा आणि नाण्यांशी संबंधित १० खास गोष्टी

आपण नोटा आणि नाण्यांचा वापर दैनंदिन करतो. नकली नोटा कशा ओळखावा याच्या क्लृप्त्या आपण आजपर्यंत अनेकदा वाचल्या असतील. तरीसुद्धा नोटा आणि नाण्यांच्या बाबतीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला अजून माहित नाहीत. पाहूया त्यासंबंधी १० खास गोष्टी…

१) पाच आणि दहा हजारांची नोट १९५४ पासून १९७८ पर्यंत चलनात होती.

२) स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात भारतीय नोटांचा उपयोग त्यांच्या देशाचा स्टॅम्प लावून करण्यात येत होता. तिथे अधिक नोटांची छपाई झाल्यानंतर हा वापर करण्यात आला.

३) बांग्लादेशात ब्लेड बनविण्यासाठी भारतीय ५ रुपयांच्या नाण्यांची तस्करी केली जात होती. एका ५ रुपयांच्या नाण्यापासून ६ ब्लेड बनवले जात होते. प्रत्येक ब्लेडची किंमत २ रुपये होती. या गोष्टीची माहिती होताच भारताने ५ रुपयांचे नाणे बनवण्यात वापरला जाणारा धातूच बदलून टाकला.

४) नेपाळमध्ये जर तुम्ही ५०० आणि १००० च्या नोटांसोबत पकडला गेलात तर तुम्हाला त्याची शिक्षाही होऊ शकते. वास्तविक खोट्या नोटांच्या वाढत्या घटनांमुळे नेपाळने भारतीय ५०० आणि १००० च्या नोटांवर तिथे प्रतिबंध घातले आहेत.

५) तुम्हाला माहित आहे सगळ्या नोटा जारी करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. परंतु एक रुपयांची नोट भारताचे अर्थ मंत्रालय जारी करते. या नोटेवर आरबीआयच्या गव्हर्नर ऐवजी वित्त सचिवांची सही असते.

६) कॉम्प्युटरच्या की बोर्डवर आपल्याला भारतीय रुपयाचे चिन्ह (₹) टाईप करायचे असेल तर “Ctrl + Shift + $” ही बटणे एकाच वेळी टाईप करावी लागतील.

७) जर तुम्ही प्रत्येक नाणे निरखून पाहिले तर त्यावर त्याचे जारी झाल्याचे साल छापलेले दिसेल. त्याच्याखाली एक निशाण असते, त्यावरून आपल्याला माहिती होते की हे नाणे कुठल्या टांकसाळीत तयार करण्यात आले आहे. जर सालाच्या खाली डायमंड चिन्ह असेल तर ते नाणे हैद्राबादच्या टांकसाळीत बनले आहे. जर डॉट असेल तर ते नाणे नोएडा मधील टांकसाळीत बनले आहे. मुंबई आणि कोलकाता येथेही नाणी पडण्याच्या टांकसाळी आहेत.

८) प्रत्येक भारतीय नोटेवर एक खास प्रकारचे चित्र छापलेले असते. हे चित्र एखाद्या प्राणी, भौगोलिक रचना, मनुष्य किंवा स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंधित असते.

९) १० रुपये बनवण्याचा खर्च ६.१० रुपये आहे.

१०) हिंदी आणि इंग्रजी शिवाय १५ भारतीय भाषांचा उपयोग नोटांवर केला जातो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *