विजय शंकर वर्ल्ड कपमध्ये हा विक्रम करणारा पहिला भारतीय ठरला!

विश्वचषकातील भारत पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात भारतीय फलंदाजानी जबरदस्त कामगिरी केली. रोहित शर्माने शतकी खेळी खेळली तर विराट आणि राहुलच्या अर्धशतकी खेळींच्या बळावर भारताने धावांचा डोंगर उभारला.

भारताला या सामन्यात एक बदल करावा लागला होता. भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे या सामन्याला मुकला. त्याच्याजागी विजय शंकरला संधी मिळाली. विजय शंकरची हि विश्वचषकातील पहिलीच मॅच होती. त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष होते. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी १३६ धावांची सलामीला पार्टनरशिप करून शिखर ची कमी जाणवू दिली नाही. तर विजय शंकरने गोलंदाजीत रेकॉर्ड कामगिरी करत आपली निवड सार्थ ठरवली.

विजय शंकरचा वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात विक्रम-

पाकिस्तानविरुद्धच्या या मॅचमधून विजय शंकरने त्याच्या वर्ल्ड कपमधल्या मॅचमध्ये पदार्पण केलं. शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे विजय शंकरला या मॅचमध्ये संधी मिळाली. बॅटिंग करताना विजय शंकरला फारशी चमकदार कामगिरी करता आली नसली तरी त्याने बॉलिंग करताना विक्रमाला गवसणी घातली.

पाकिस्तानची बॅटिंग सुरु असताना ५वी ओव्हर भुवनेश्वर कुमार टाकत होता. पण मांडीच्या मांसपेशींना दुखापत झाल्यामुळे भुवनेश्वर कुमार मैदानातून बाहेर गेला. यामुळे भुवनेश्वर कुमारची उरलेली ओव्हर विजय शंकर पूर्ण करायला आला. यानंतर पहिल्याच बॉलला विजय शंकरने इमाम उल हकला एलबीडबल्यू आऊट केलं.

वर्ल्ड कपच्या पहिल्याच बॉलला विकेट घेणारा विजय शंकर हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. वर्ल्ड कपमध्ये याआधी ८ खेळाडूंनी अशी कामगिरी केली आहे. १९९९ साली मार्क एल्हम, २००३ साली इयन हार्वे, २००७ साली जेम्स फ्रॅन्कलिन, मलाची जोन्स, मोहम्मद युसूफ, २०११ साली थिसारा परेरा आणि जेम्स नॉचे, २०१५ साली दौलत जादरानने हा विक्रम केला होता.

विजय शंकरने हा विक्रम करत अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय बनण्याचा मान मिळवला. विजयने या सामन्यात दोन विकेट घेतल्या. या कामगिरीच्या बळावर पुढील सामन्यांसाठी आपले संघातील स्थान विजय शंकरने मजबूत केले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *