फादर्स डे निमित्त वडिलांना डोळ्यांच्या ऑपरेशनचे गिफ्ट देणाऱ्या दोन मुलांचा रस्त्यातच झाला मृत्यु

आपल्या वृद्ध वडिलांच्या कमकुवत डोळ्यांवर उपचार करुन त्यांना हे जग पाहता यावं म्हणून त्यांच्या डोळ्यांवर ऑपरेशन करुन कार मध्ये घरी निघालेल्या दोन मुलांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समोरून येणाऱ्या परिवहन बसने दोघांच्या कारला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ज्या मुलांनी आपल्याला डोळे दिले, त्याच डोळ्यांनी आपल्या दोन्ही मुलांचे मृतदेह पाहण्याची दुःखद वेळ त्या निरागस बापावर आली.

कोण आहे तो दुर्दैवी बाप ?

राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगढ भागातील खुडी छुटी गावात अर्जुन जाट नावाचे गृहस्थ राहतात. त्यांची पत्नी सरकारी शाळेत शिक्षिका आहेत. या दाम्पत्याला विकास आणि पंकज अशी दोन मुले होती. अर्जुन दहा वर्षांपासून इंडियन आर्मी मध्ये भारतमातेची सेवा करत होता. तर पंकज मुंबईत राहून फोटो स्टुडिओ आणि डीजे म्हणून काम करत होता. विकासाला तीन मुली आहेत. आपल्या वडिलांवर डोळ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी दोन्ही भाऊ गावी आले होते.

कशी घडली दुर्घटना ?

पोलिसांच्या माहितीनुसार विकास आणि पंकज हे दोघेही आपले वडील अर्जुन जाट यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी त्यांना घेऊन सीकर शहरात आले होते. बजाज रोडवरील हॉस्पिटलमध्ये वडिलांच्या डोळ्यांचे ऑपरेशन यशस्वी झाल्यांनतर त्यांना आराम करायला सांगून दोन्ही भाऊ आनंदात आपल्या दुसऱ्या कामानिमित्त सिंगरावटच्या दिशेने निघाले होते.

बाडलवास जवळ समोरुन वेगात येणाऱ्या परिवहन बसने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेने फौजी विकास जागीच ठार झाले तर पंकजने दवाखान्यात पोहोचेपर्यंत श्वास सोडला.

वडिलांना दिलेले वचन पूर्ण केले पण शाबासकी द्यायला मुलेच राहिली नाहीत

दिनही भावांनी आपल्या वडिलांना फादर्स डे निमित्त त्यांच्या कमकुवत डोळ्यांवर ऑपरेशन करण्याचे वचन दिले होते. त्यासाठी दोघेही वेळ काढून गावी आले, बोलल्याप्रमाणे दोघांनी आपल्या वडिलांच्या डोळ्यांचे यशस्वी ऑपरेशन केले. पण ऑपरेशन नंतर डोळ्यांवरील पट्टी काढताच त्या वडिलांना आपल्या दोन्ही मुलांचे मृतदेह बघण्याचे दुर्भाग्य वाट्याला आले. मुलाचे मृतदेह पाहून आईवडील बेशुद्ध पडले. नियती अशी परीक्षा घेते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *