चोरलेले मूल २६ वर्षांनी केले परत, वडिलांनी नकार देताच चोराने ठोठावला कोर्टाचा दरवाजा

घरात काम करणाऱ्या नोकर किंवा मोलकरणीकडून घरातील सामान किंवा पैशांच्या चोरीची अनेक प्रकरणे समोर येतात. पण चीनच्या बीजिंग शहरात एक मोलकरणीने घरातील मुलच चोरुन नेले होते. आता २६ वर्षानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे.

१९९२ मध्ये बीजिंग मध्ये राहणाऱ्या शियांग पिंग नावाच्या महिलेला दोन मुले झाली, पण त्या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या जवळच्या नातेवाईकांनी सांगितले की, जर तिने कुणाचे तरी बाळ चोरले तर तिचे नशीब ठीक होऊन जाईल आणि ती एका बाळाला जन्मही देऊ शकेल.

त्यांनतर शियांग पिंग बीजिंग मधील एका कुटुंबात मोलकरीण म्हणून काम करायला लागली. त्या घरात काम करत असताना संधी पाहून शियांग पिंगने मालकाचे १५ महिन्यांचे बाळ चोरले आणि तिने तिथून पळ काढला. हि चोरी केल्यानंतर जवळपास तीन वर्षानंतर शियांगने एका मुलीला जन्म दिला.

२६ वर्षांनंतर शियांगला आपण खूप मोठी चूक केल्याची जाणीव झली. तिला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला. तिने विचार केला की त्या मुलाला त्याच्या खऱ्या आईवडिलांजवळ सोडले पाहिजे. शियांग त्या मुलाला घेऊन बीजिंग मधील त्या मालकाच्या घरी गेली आणि तिने चोरीची सगळी कहाणी सांगितली. पण शियांगला तेव्हा धक्काच बसला जेव्हा तिथल्या लोकांनी तिला सांगितले की त्यांचे बाळ तेव्हाच सापडले होते.

त्यांनतर शियांगने कोर्टाचा दरवाजा ठोठावला. कोर्टाने मुलाच्या DNA टेस्ट करण्याचे आदेश दिले. शेवटी DNA रिपोर्ट आल्यानंतर शियांगकडे असणारा मुलगाच मालकाचा खरा मुलगा असल्याचे उघड झाले. शियांगचा विजय झाला. तिने मुलाला त्याच्या खऱ्या आईवडिलांकडे सोडले. पण प्रश्न अद्याप बाकी आहे, की मालकाला सापडलेले ते दुसरे बाळ कोणाचे होते ?

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *