जगातील या ७ अनोख्या रेस्टोरंटमध्ये कधी नग्न होऊन तर कधी टॉयलेट सीटमध्ये दिले जाते जेवण

आजकाल सर्वच गोष्टीत क्रिएटिव्हिटी आली आहे. मग ते तुमचे कपडे असतील किंवा तुमचं जेवणं ! प्रत्येक गोष्टीत लोकांना जरा हटके वाली फिलिंग ही लोकांची गरज बनली आहे. तसं बघायला गेलं तर जगात अजब अशा विचित्र रेस्टोरंटची कसलीच कमतरता नाही. पण त्यापैकी काही असेही आहेत, ज्यांच्या थीममुळे ते जगात प्रसिद्ध झाले आहेत. इथे आम्ही आपणाला अशाच काही रेस्टोरंट बद्दल सांगणार आहोत ज्यांची जेवण वाढण्याची पद्धत अशी आहे जी आपण कधी ऐकली नसेल किंवा पहिलीही नसेल.

१) आईस रेस्टोरंट, दुबई – तसं बघायला गेलं तर दुबई असतानाच एक अनोखे शहर आहे. इथल्या गर्मीला मात देण्यासाठी असं एक रेस्टोरंट बनवण्यात आलं आहे, जे दुबईमधील एकमेव बर्फ़ाळ ठिकाणांपैकी एक आहे. इथे तुम्हाला अगदी अंटार्क्टिका ध्रुवासारखी थंडी अनुभवता येईल. या रेस्टोरंटला संपूर्णपणे कृत्रिमरीत्या बर्फ आणि काचेपासून बनवण्यात आले आहे. इथले तापमान नेहमी शून्याच्या खाली राहील याची काळजी घेण्यात आली आहे. इथे केवळ त्याच गोष्टी मिळतात ज्या बर्फापासून बनवलेल्या असतात.

२) न्युड रेस्टोरंट, लंडन – कदाचित आपल्यापैकी कुणीही याबद्दल विचार केला नसेल की, सार्वजनिक ठिकाणी कपड्यांशिवाय नग्न जेवण केलं जाईल. तुम्ही विचार कराल हे कसं शक्य आहे ? कपडे न घालता कुणी जेवण करतं का ? पण हे खरं आहे ! २०१६ मध्ये “द बुनियादी” नावाचे जगातील पहिले न्यूड रेस्टोरंट लंडनमध्ये उघण्यात आले आहे. इथे हजारोंच्या संख्येने लोक जेवण्यासाठी रेस्टोरंटची बुकिंग करतात. इथल्या वेट्रेस, शेफ आणि लोक सर्वजण नग्न राहून जेवण बनवतात, वाढतात आणि खातात.

३) न्योताईमोरी रेस्टोरंट, जपान – न्योताईमोरी या शब्दाचा अर्थ आहे महिलेच्या शरीरावर वाढण्यात आलेले जेवण ! याला बॉडी सुशी असेही म्हणतात. या रेस्टोरंटमध्ये मोठमोठ्या डायनिंग टेबलवर इथली सर्वात खास डिश “सुशी सा साशिमी” मुलींच्या नग्न शरीरावर वाढली जाते. एवढच नाही, तर या मुलीच्या चारी बाजूने बसून लोक ही सुशी डिश खातात. नग्न शरीरावर जेवण वाढण्याची ही विचित्र परंपरा जपानमध्ये कित्येक वर्षांपासून आहे.

४) प्रिजन थीम रेस्टोरंट, चीन – तसं बघायला गेलं तर चीनमध्ये एकच नाही, तर अनेक विचित्र थीम असणारी रेस्टोरंटस आहेत. परंतु त्यामध्ये प्रिजन म्हणजेच तुरुंगासारख्या जागेचा अनुभव देणारे रेस्टोरंट आपल्या वेगळ्या अशा जेवण वाढण्याच्या पद्धतीबद्दल चर्चेत आहे. इथे तूम्हाला गजांआड असणाऱ्या टेबलवर जेवण वाढण्यात येते. कैदी आणि जेलरच्या कपड्यांत इथले वेटर्स तुमचा पाहुणचार करतात. इथे तुम्ही कोणताही गुन्हा न करता जेलची हवा आणि स्वादिष्ट अन्न खाऊ शकता.\

५) हर्ट अटॅक ग्रील रेस्टोरंट, अमेरिका – अमेरिकेच्या लास वेगास शहरात बनलेले “हर्ट अटॅक ग्रील” रेस्टोरंट आपल्या वेगळ्या पद्धतीच्या डिशेस आणि थीम साठी जगभरात प्रसिद्ध आहे. जसे तुम्ही या रेस्टोरंट मध्ये पाऊल ठेवाल, इथल्या मादक वेट्रेस नर्सच्या युनिफॉर्ममध्ये तुमचे स्वागत करतील. या तुम्हाला एक पेशंटला घालावयाचा गाऊन देतील. हा गाऊन घालूनच तुम्हाला जेवण करावे लागते. इथल्या डिशेसची नावेही विचित्र आहेत. इथे लाईन फ्रीज प्लेट, बायपास बर्गर, कोरोनरी हॉट डॉग अशाच गोष्टी जेवणामध्ये वाढल्या जातात, ज्यात खूप कॅलरी असते.

६) टॉयलेट रेस्टोरंट, तैवान – टॉयलेट सीट म्हणजेच कमोडचे काय काम असते आपल्याला माहित आहे. परंतु आपण कधी विचार केला नसेल की याचा उपयोग जेवण्यासाठी केला जातो. चीनमधील तैवानमध्ये असे एक रेस्टोरंट आहे, जिथे टॉयलेट सीटवर बसूनच जेवण करावे लागते. एवढंच नाही तर इथल्या डिशेस आणि ड्रिंक्स सुद्धा टॉयलेट सीटच्या भांड्यातच वाढल्या जातात.

७) रेस्टोरंट इन एअर, बेल्जीयम – बेल्जीयम मधील हे एक असे रेस्टोरंटी आहे जे हवेत लटकलेले असते. इथे हवेतच जेवण वाढले जाते. खरं बघता इथे एका क्रेनच्या मदतीने हवेत ५० मित्र उंचीवर एक डायनिंग टेबल आणि खुर्च्या असणारा सेटअप लटकावला जातो. त्यावर बसूनच लोक पाहुणचाराचा आनंद घेतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *