रणवीर सिंह नेहमी रंगेबेरंगी आणि विचित्र कपडे का घालतो माहिती आहे का?

काल मँचेस्टर येथे विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना खेळाला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्याकडे विश्वाचे लक्ष लागलेले असते. भारताने सातव्यांदा पाकिस्तानला विश्वचषकात पराभूत केले. हा सामना बघायला अनेक सेलेब्रिटी आणि नेत्यांची स्टेडियममध्ये उपस्थिती होती.

अभिनेता रणवीर सिंह तर या सामन्यात कॉमेंटरी करताना दिसला. रणवीरने स्टेडियममध्ये उपस्थित राहून संपूर्ण सामन्याचा आनंद घेतला. सामना सुरु होण्यापूर्वी एक्सट्रा इनिंग या कार्यक्रमात तो मैदानात आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये उपस्थित होता. त्याचे कपडे नेहमीप्रमाणे हटके होते. त्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

अनेकांना प्रश्न पडत असेल कि रणवीर सिंह हा नेहमीच रंगीबेरंगी आणि विचित्र कपडे का घालतो. तर आज या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे. खासरेवर जाणून घेऊया रणवीर सिंह हा नेहमी चित्रविचित्र कपडे का घालतो.

रणवीर अनेक शो आणि कार्यक्रमात रंगीबेरंगी किंवा थोड्या हटके स्टाईलचे कपडे घालतो. त्याच्या या स्टाईलमुळे बऱ्याचदा सोशल मीडियावरही रणवीर सिंहला ट्रोल करण्यात आले आहे. मात्र फादर्स डेच्या निमित्ताने अशा प्रकारचे फॅशन आणि कपडे घालण्याच्या आयडिया कुठून येताl याबद्दल रणवीरने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून सांगितले आहे.

रणवीरने वडील जगजीत सिंह भवनानी यांचा एक जुना फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याचे वडील हे सिल्व्हर मॅटेलिक जॅकेट मध्ये दिसत आहेत. त्याच्या वडिलांचा हा लूक देखील हटके आहे. रणवीर त्याच्या वडिलांकडूनच हटके स्टाईल शिकल्याचे लक्षात येते. त्याने तसं पोस्टच्या कॅप्शन मध्ये देखील लिहिलं आहे कि ‘आता तुम्हाला समजलं असेल’.

रणवीर सध्या ८३ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा भारताने जिंकलेल्या १९८३ च्या विश्वचषकावर आधारित असणार आहे. रणवीर सिंह या सिनेमात कपिल देवच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात दीपिका पदुकोण हि कपिल देवच्या पत्नीची भूमिका निभावताना दिसणार आहे. लग्नानंतर दोघांचा हा पहिला एकत्र सिनेमा असणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *