क्रिकेट मध्ये वापरल्या जाणाऱ्या या इंग्रजी शब्दांचा मराठी अर्थ माहिती आहे का ?

क्रिकेट मधील कोमेंट्री म्हणजे समालोचन आपण सर्व ऐकतो परंतु मराठीत क्रिकेट मधील काही गोष्टींना काय म्हटले जाते याचा कधी आपण विचार केला का ? जसे ओव्हर द विकेट किंवा फुटवर्क इत्यादी गोष्टीचे इंग्रजी शब्द आपण मराठी मध्ये सुध्दा वापरतो. त्यामुळे क्रिकेट खेळातून मराठी हद्दपार झाली का हा प्रश्न अनेकांना पडायला हवा त्यासाठीच आम्ही तुम्हाला क्रिकेट संबंधी काही इंग्रजी शब्दांचा मराठीत अर्थ सांगणार आहोत.

क्रिकेट खेळातून मराठी हद्दपार…?

गोलंदाजी मध्ये वापरले जाणारे शब्द ‘जमिनीला सरपटत जाणारा चेंडू'(ground the ball) ‘डाव्या एस्टीला सोडून जाणारा चेंडू'( wide to leg stump) पंचांच्या वरच्या दिशेने…(over the wicket) पंचास वळसा घालून….(round the wicket) डावखुरा गोलंदाज (left handed bowler)

फलंदाजी करताना वापरले जाणारा शब्द

उत्तुंग षटकार ( maximum six) सिमरेषे जवळ ( near the boundarie) अप्रतिम झेल ( amazing catch) यस्टीरक्षक ( wicketkeeper) फलंदाज (batst man) गोलंदाज ( bowler) क्षेत्र रक्षक ( fielder) डावाची सुरवात ( opening the match) फलंदाजांचे पद लालित्य ( footwork) बळी ( wicket)…..

अशा एक ना अनेक मराठी शब्दांनी क्रिकेट या मूळ इंग्रजांच्या खेळास मराठी समालोचनाने त्या काळी या खेळास महाराष्ट्रात घराघरात पोहचवले होते.
कानाला रेडिओ लावून ‘बाळ करमरकर’यांचं धावत वर्णन ऐकून अनेकांना क्रिकेट बऱ्या पैकी समजले. आज क्रिकेट च्या बाजरीकरणात मराठी समालोचन हद्दपार झालं…. मात्र ११ कोटी महाराष्ट्राच्या क्रिकेट चाहत्यांना,आजच्या पिढीला मराठी समालोचनास कायम मुकावे लागले… कारण काय..?

गर्जा महाराष्ट्र माझा..

लेख साभार प्रमोद कुदळे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *